तापी दुथडी भरून वाहत नसली तरी दोन्ही किनाऱ्याच्या मधोमध एक मोठी धार वाहत झेपावत पुढे निघाली होती. आज तिच्या काठावर अभंगाचे सूर उमटले. टाळ-मृदुंगाचा नाद घुमला. हरिनामाचा गजर झाला. हिरव्या कंच वनराईत भगव्या पताका डोलू लागल्या. आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा तापीच्या किनाऱ्यावर विसावला. हे पाहून तापीचा प्रवाह आनंदला! संत जनांची मांदियाळी पाहून त्या प्रवाहाचे डोळे भरून पावले. तो दिवस, हो तोच दिवस, तापी आजपावेतो कधीही विसरली नाही. विसरणारही नाही. तो दिवस होता – ‘वैशाख मासातील वैद्य दशमीचा.’
पुढे वाचाDay: March 8, 2024
ना देवी, ना दासी – – हिरालाल पगडाल, संगमनेर
लाखो वर्षाच्या मानवी इतिहासाच्या वाटचालीत एक बाब स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे जगातील बहुसंख्य संस्कृतींनी स्त्रीच्या महात्म्याला दगडाच्या, मातीच्या, धातूच्या मूर्तीत बंद करून देवळात कोंडून ठेवले आहे. वास्तव जीवनात मात्र स्त्रीच्या वाट्याला पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले आहे. तिचे जिणे पुरुषांच्या तुलनेत कष्टदायी आणि विनासन्मानाचे आहे.
पुढे वाचाआणखी किती काळ लढावे लागणार? – संदीप वाकचौरे
जगाच्या पाठीवर महिलांवर अन्याय, अत्याचार होत होते. त्यांना माणूस म्हणून पुरूषांच्या बरोबरीच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. आज आपण समता आणि समानतेचा विचार करत आहोत. महिलाना समान अधिकार द्यायला हवे, अशी भाषा होत असली तरी २१ व्या शतकातही त्यांना पुरूषांच्या बरोबरीने वागवले जात नाही हेही वास्तव लक्षात घ्यायला हवे. आपल्याही देशात महिला अजूनही समतेच्या अधिकारासाठी लढा देत आहेत. महिलांना आज जे काही जगात समान अधिकार मिळत आहेत त्यासाठी जगातील महिलांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. कधी अंहिसेची वाट, कधी हसक स्वरूपाची आंदोलने झाली आहेत. आठ मार्च हा महिलांच्या अधिकाराची मागणी…
पुढे वाचापेट्रोलपंप चालविण्याची बालपणीची ‘मनीषा’ झाली पूर्ण, व्यवस्थापक ते कर्मचारी सर्व महिलाच
बाई आणि बदलणारे जग – मृणालिनी कानिटकर – जोशी
एक काळ असा होता की, स्त्री अनेक प्रकारच्या सामाजिक, कौटुंबिक जाचाच्या शृंखलांनी बद्ध होती. तिला ह्या जाचातून मुक्त करण्यासाठी त्याकाळी अनेक समाजसुधारक, विचारवंत हळूहळू पुढे येऊ लागले. ह्या शृंखलांचे वेढे सैल करण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना कितीही वाटत असलं तरी परंपरावादी, जुनाट मानसिकता असणाऱ्या समाजाचा विरोध पत्करून क्षणार्धात ह्या शृंखला तोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे धिम्या गतीने पण निश्चितपणे ह्या दिशेने समाजाची वाटचाल सुरू झाली होती. सर्व नाही तरी काही स्त्रिया पुढे येऊन शिकत होत्या कवा त्यांना त्यांच्या घरात शिकण्यासाठी पाठबा मिळत होता. त्या सामाजिक कार्यात सहभागी होत होत्या. अगदी…
पुढे वाचापहिलटकरणी – सुधीर जोगळेकर
बाई असूनही समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात भारतीय स्त्रियांनी गाठलेली उत्तुंग यशाची ‘भारी’ शिखरं ही भारतीय इतिहासाला नवीन नाहीत. जे जे क्षेत्र या महिलांनी निवडलं, त्या त्या क्षेत्रातील पुरुषप्रधानतेवर मात करत, त्या त्या क्षेत्रातलं पुरुषी वर्चस्व झुगारून देत, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जगाला दाखवून देणारे नवनवे विक्रम या महिलांनी सुस्थापित केले. कंबर कसून, पाय घट्ट रोवून उभ्या राहत, ज्यांनी इतिहास घडवला अशा या स्त्रिया एका अर्थानं त्या त्या क्षेत्रातल्या ‘पहिलटकरणी’ ठरल्या. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित तिघींचा हा परिचय. १. कादंबिनी बोस-गांगुली वैद्यकीय व्यवसाय करणारी पहिली भारतीय महिला (१८ जुलै १८६१ – ३ ऑक्टोबर १९२३)…
पुढे वाचास्वकर्तुत्वाने सन्मान मिळवताना – शिरीष चिटणीस
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या लिखाणात म्हटलेय, “माझ्या अगोदरचा कृष्णा म्हणून माझा भाऊ सहा महिन्यांचा असताना आईच्या अंगाखाली चिरडून झोपेत कधी मेला ते कळलेच नाही. त्याला पाजीत असताना आईला गाढ झोप लागून मुलाचा दम कोंडून सकाळी तो मेलेला आढळला! मग त्या एकांताला आणि आईच्या हालाला कोण सीमा असणार!”
पुढे वाचा