पहिलटकरणी – सुधीर जोगळेकर

बाई असूनही समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात भारतीय स्त्रियांनी गाठलेली उत्तुंग यशाची ‘भारी‌’ शिखरं ही भारतीय इतिहासाला नवीन नाहीत. जे जे क्षेत्र या महिलांनी निवडलं, त्या त्या क्षेत्रातील पुरुषप्रधानतेवर मात करत, त्या त्या क्षेत्रातलं पुरुषी वर्चस्व झुगारून देत, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जगाला दाखवून देणारे नवनवे विक्रम या महिलांनी सुस्थापित केले. कंबर कसून, पाय घट्ट रोवून उभ्या राहत, ज्यांनी इतिहास घडवला अशा या स्त्रिया एका अर्थानं त्या त्या क्षेत्रातल्या ‘पहिलटकरणी‌’ ठरल्या. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित तिघींचा हा परिचय. १. कादंबिनी बोस-गांगुली वैद्यकीय व्यवसाय करणारी पहिली भारतीय महिला (१८ जुलै १८६१ – ३ ऑक्टोबर १९२३)…

पुढे वाचा