Sahitya Chaprak Marathi Masik Magazines Logo

Update On Chaprak Bookstore (चपराक पुस्तकालयाबद्दल )

Share this post on:

नमस्कार!

‘चपराक’च्या माध्यमातून आपण आजवर अनेक प्रयोग केले आहेत. एक दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, प्रभावी मासिक आणि उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यांवर आपले काम सर्वदूर पोहोचले आहे. नवनवीन पुस्तकांची वाढती मागणी आणि ‘चपराक’ साप्ताहिक, मासिकाचे वाढतच जाणारे सभासद यामुळे अनेक वाचक जोडले जातात. त्यांना ‘चपराक’सह अन्य प्रकाशकांच्या लेखकांची पुस्तकेही हवी असतात. त्यांच्याकडून सातत्याने तशी मागणी येत असते.

आपली स्वतंत्र वितरण व्यवस्था असल्याने इतर प्रकाशकांची पुस्तके आपल्याकडे विक्रीला नव्हती! मात्र वाचकांना हवी ती दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत, अन्य प्रकाशकांना विक्रीसाठी हातभार लावावा आणि अत्यंत सचोटीने ग्रंथ व्यवहारही जपावा म्हणून आम्ही ‘चपराक’च्या ऑनलाईन बुक शॉपीवर ती विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहोत. यात आपल्याला अनेक महत्त्वाची पुस्तके घरपोच देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला आपण योग्य तो प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी संपर्क – info@chaprak.com

साहित्य चपराक – http://chaprak.com

चपराक पुस्तकालय (Chaprak Bookstore) – http://shop.chaprak.com

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!