न्यायाच्या बाजू अनेकदा दुर्बोध आणि त्यामागील कारणमीमांसा अनाकलनीय असते. न्याय हे सुडाचे प्रतीक बनून गेले असल्याचे आपल्याला मध्ययुगपूर्व कायद्यांतून दिसून येते. मग ते धार्मिक न्याय असोत की राजसत्ता प्रवर्तित. अनेकदा दोन्हीही न्याय हे एकमेकांत बेमालूम मिसळले गेले असल्याचेही आपल्याला दिसून येईल. हाताच्या बदल्यात हात आणि डोळ्याच्या बदल्यात डोळा हे नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रदीर्घ काळ मानवी जगावर राज्य करत असल्याचे आपल्याला त्याचमुळे दिसते.
पुढे वाचाDay: May 28, 2024
सावरकरांची कविता: आत्मबल -सौ. सुषमा राम वडाळकर, बडोदे
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्या लेखनातून व आजवर वाचलेल्या त्यांच्याबद्दलच्या प्रत्येक लेखातून, पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते ती त्यांची प्रखर देशभक्ती, ओजस्वी बुद्धिमत्ता, त्यांची काव्यप्रतिभा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे ‘आत्मबल’ होय. या आत्मबलाच्या जोरावरच तर ते मार्सेलिसच्या समुद्रात जहाजाच्या हातभर रुंद खिडकीतून 20 फूट उंचावरून अथांग समुद्रात उडी टाकू शकले होते व याच आत्मबलाच्या जोरावर अंदमानासारख्या ठिकाणी एका अंधार्या कोठडीत, अनन्वित शारीरिक तसेच मानसिक छळ सहन करू शकले होते. ‘आत्मबल’ या त्यांच्याच कवितेत त्यांनी मृत्युला केलेले एक भीषण आव्हान आहे व तेही राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झपाटलेल्या वृत्तीमुळे.काय असेल त्या वेळी त्यांची गलबलवणारी…
पुढे वाचासुख म्हणजे नक्की काय असतं!!
बालपण आठवले की मला एकच गाव कधीही आठवत नाही. जसं कळायला लागलं आणि मला पहिल्यांदा शाळेत घातलं ते माझ्या वडिलांच्या मूळ गावी असणाऱ्या बालवाडीत. वडील व चुलते नोकरीसाठी मुंबईला आणि आमचे आज्जी आजोबा गावी असल्याने आमचं कुटुंब आणि काकांचे कुटुंब आलटून पालटून काही वर्षे मुंबई तर काही वर्षे गावी राहत. बरं , गावी राहिल्यावर मी वडिलांच्या गावीच राहिलेय आणि एकाच शाळेत शिकले असंही नाही.
पुढे वाचादहावी नंतर काय करायचं? – डॉ. श्रीराम गीत
35% ते 65% मिळवून यशस्वी होणार्यांसाठी गरजेचे कोणताही अभ्यासक्रम शिकण्यासाठी एक अडचण असते. आपण पहिलीपासून दहावीपर्यंत कुठला ना कुठला तरी क्लास लावून शिकत आलेलो असतो. ज्यांनी लावलेला नाही त्यांच्या संदर्भात हा प्रश्न येत नाही पण असे विद्यार्थी फारच क्वचित सापडतात. ही अडचण अकरावी नंतरच्या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये बर्यापैकी उद्भवते. ज्या संस्थेच्या अभ्यासक्रमाला आपण प्रवेश घेतो त्यासाठीचे पैसे बँक कर्ज म्हणून देऊ शकते पण कोणत्याही क्लाससाठी किंवा खाजगी शिकवणीसाठी पैसे कोणीही देत नाही. केवळ याच कारणामुळे सायन्स, कॉमर्स अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या मुलांची फरपट होते. यश मिळत नाही. यावर काय उपाय आहे हे…
पुढे वाचा