जीवनात दुःख का? – संदीप वाकचौरे

सकाळी सकाळी सूर्याने आपली कोवळी किरणे पृथ्वीवर टाकली होती. त्यात प्रकाश होता त्याप्रमाणे शीतलताही होती. पक्षी छान गुंजन करत होते. सकाळी थंडगार हवा वाहत होती. झाडांवरील फुले आपल्या सौंदर्याचे दर्शन घडवत होती. आपल्या जवळच्या सुंगधाची निसर्गात उधळण करत होती. निसर्गाचा भाव देण्याचा होता. त्यात कोणताही दुजाभाव राखला जात नव्हता. सकाळी सकाळी निसर्गाकडे पाहत गेले की, मनाचा साराच भाव प्रसन्न होत जातो. निसर्ग रोज पाहावा तर असाच बहरलेला असतो. तो सतत वाटत असतो. त्याच्यात समर्पणाचा भाव असतो, आनंदाचा भाव असतो आणि आहे त्याची उधळण असते सारी. अशावेळी त्याच्याकडूनच आपण काही घ्यायला…

पुढे वाचा

शिक्षणाविषयी चर्चा घडविणारे पुस्तक..परिवर्तानाची वाट

शिक्षणाविषयी बरंच काही बोलले जाते..शिक्षणाचा पारंपारिक विचार सातत्याने समाजमनावर गारूड करून राहीलेला आहे. अशावेळी शिक्षणाचा खरा विचार समाजमनात रूजविण्याची गरज सातत्याने व्यक्त केली जाते.शेवटी शिक्षण ही एक प्रक्रिया आहे.त्या प्रक्रियेच्या माध्यमातून परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असतात.अशावेळी शिक्षणाचा विचार समाजासमोर मांडण्याचा संदीप वाकचौरे यांच्या परिवर्तनाची वाट या पुस्तकातून करण्यात आला आहे.चपराक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होणा-या शिक्षण मालेतील हे पुस्तकही वाचकांना शिक्षणाची नवी दिशा देण्याचेच काम करते आहे.पुस्तकाचे शीर्षक हेच मुळी शिक्षणाची नवी वाट दाखविणारे आहे.

पुढे वाचा

शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी सार्‍या विश्वासाठी आर्ततेनी भाकलेली प्रार्थना म्हणजे पसायदान! सार्‍या विद्यार्थी समूहांसाठी शिक्षकांकडे मागितलेले असेच मूल्यशिक्षणाचे दान म्हणजे ‘चपराक’ने प्रकाशित केलेल संदीप वाकचौरे यांचे ‘शिक्षणाचे पसायदान.’ या पुस्तकाची मांडणी तीस प्रकरणात केली आहे. शिक्षणाबद्दलचा दूरदृष्टीपणा व शिक्षकांकडून नेमके कोणते वर्तन अपेक्षित आहे, याचे प्रभावी विवेचन या पुस्तकात आहे. एखादा शिक्षक चुकला तर तो भावी पिढी सार्थतेने घडवू शकणार नाही, हे लेखकाचे विधान महत्त्वाचे आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याप्रमाणे एखाद्या शिक्षकाने ज्ञानदानाचे काम चोख बजावायचे ठरवले तरच त्यांच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडेल. अब्दुल कलामांना त्यांचे प्राथमिकचे शिक्षक जास्त…

पुढे वाचा