शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी सार्‍या विश्वासाठी आर्ततेनी भाकलेली प्रार्थना म्हणजे पसायदान! सार्‍या विद्यार्थी समूहांसाठी शिक्षकांकडे मागितलेले असेच मूल्यशिक्षणाचे दान म्हणजे ‘चपराक’ने प्रकाशित केलेल संदीप वाकचौरे यांचे ‘शिक्षणाचे पसायदान.’ या पुस्तकाची मांडणी तीस प्रकरणात केली आहे. शिक्षणाबद्दलचा दूरदृष्टीपणा व शिक्षकांकडून नेमके कोणते वर्तन अपेक्षित आहे, याचे प्रभावी विवेचन या पुस्तकात आहे. एखादा शिक्षक चुकला तर तो भावी पिढी सार्थतेने घडवू शकणार नाही, हे लेखकाचे विधान महत्त्वाचे आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याप्रमाणे एखाद्या शिक्षकाने ज्ञानदानाचे काम चोख बजावायचे ठरवले तरच त्यांच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडेल. अब्दुल कलामांना त्यांचे प्राथमिकचे शिक्षक जास्त…

पुढे वाचा