आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का? 

आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का? 

आपल्या देशात इंग्रजांच्या काळात एखाद्या भयंकर रोगाची साथ आली की लोक पटापट मृत्यूमुखी पडायचे! पुरेशा वैद्यकीय उपाययोजना नसल्यामुळे सर्वसामान्य जनता अगदी हतबल व्हायची. त्याकाळात प्लेग रोगाची साथ आल्यानं लोकाना जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला होता! कारण त्यावेळी आजच्यासारख्या आरोग्यसेवा उपलब्ध नव्हत्या आणि ज्या काही परंपरागत उपचार पध्दती होत्या, त्या सुद्धा तोकड्या पडायच्या. कधीकधी कुचकामी ठरायच्या. नाही म्हणायला इंग्रजी राजवटीच्या अमलाखालील मिशनरी दवाखाने अस्तित्वात होते पण त्यात जायला लोक घाबरायचे!

आज मात्र आपल्या देशात सर्वप्रकारच्या आरोग्यसेवा सहज उपलब्ध आहेत. निरनिराळ्या रोगांवरही प्रभावी उपाययोजना आहेत. मात्र एखाद्या अगदी सामान्य व्यक्तीला कर्करोग, क्षयरोग, ह्रदयविकार यासारखा अतिशय गंभीर आजार अचानक उद् भवला तर तो हवालदिल होतो. कारण अशाप्रकारच्या आजारांवरची उपचारपद्धती अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे आधुनिक सोयीसुविधा असलेल्या खासगी रूग्णालयात उपचार घेण्यापासून सर्वसामान्य माणूस वंचित राहतो! काही सरकारी रूग्णालयात सुद्धा आधुनिक आरोग्यसेवा सुरू झाल्या आहेत. मात्र दुर्दैवानं या रूग्णालयातील बर्याचशा यंत्रसामग्री (उदाहरणार्थ एक्स रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन मशीन इत्यादी) बंद पडलेल्या असतात आणि ही वस्तुस्थिती आहे! तरीही आपल्या समाजात काही आदर्श डाॅक्टर असेही आहेत, जे अत्यल्प दरात आरोग्यसेवा देण्यासाठी तत्पर असतात. परंतु त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नगण्य आहे!  

मध्यंतरी पुण्यात एका कार्यक्रमात आरोग्य विषयक व्याख्यान ऐकण्याचा योग आला. तेथे एका तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली…. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization ) एका सर्वेक्षणानुसार येत्या काही वर्षात भारतीय उपखंडात तब्बल ८३ टक्के लोकाना कर्करोगाची लागण झालेली असणार अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. एवढ्या झपाट्याने या कर्करोगाचा भस्मासूर आपल्या देशात पसरतो आहे. हा खरोखरच अतिशय काळजी करण्याचा विषय आहे. त्यावेळी त्यांनी याचे कारण स्पष्ट करताना म्हटले, ‘भारतीय नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आमची आजची अत्याधुनिक जीवन शैली!’ हे अगदी खरं आहे आणि या बदललेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आज सर्वत्र दिसून येत आहेत. 

आज आपण बघतो, आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची जीवनशैली त्यांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार सतत बदलत असते. एवढंच कशाला सामान्य लोक सुद्धा आजकाल रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे यातच धन्यता मानतात. त्यामुळे दिवसभराचे नियमित वेळापत्रक कोलमडून जाते. हे सर्व आपण आजारी पडल्यावरच आपल्या लक्षात येते. मग डाॅक्टर औषध देताना बजावून सांगतातही… औषधं वेळच्या वेळी घ्या, भरपूर पाणी प्या. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा पाळा. सकाळी लवकर उठून फिरायला जा. योगासने, व्यायाम करा वगैरे वगैरे! मात्र आपण याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. काही न खाता औषध घेणे, थोडं बरं वाटलं की परत औषध न घेणे म्हणजेच औषधाचा डोस पूर्ण न करणे, घरचे सात्विक जेवण न करता बाहेरचे अर्बटचर्बट खाणे असले प्रकार आपल्याला आजकाल घरोघरी बघायला मिळतात. अशा प्रकारामुळे परत उलटून ताप येतो! म्हणजेच काय आपणच आजाराला निमंत्रण देण्यासारखा हा प्रकार असतो. कधीकधी तर हा साधारण वाटणारा ताप डेंग्यूसारख्या एखाद्या गंभीर आजारात सुद्धा रूपांतरित होण्याचा धोका असतो. मग सुरू होते एक जीवघेणी धावपळ, आर्थिक अंदाजपत्रक कोलमडल्यामुळे त्यासाठी करावा लागणारा आटापिटा, आजारी माणसासोबतच स्वतःच्या तब्येतीची काळजी! या सर्व घाईगडबडीत होतं काय की घरातील कर्त्या माणसाला अशा प्रसंगी अतिशय खंबीर राहावं लागतं. स्वतःची मानसिक स्थिती, मनाचा तोल ढासळू न देता धैर्याने एकंदर परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला सज्ज राहावं लागतं. त्यात तो कमी पडला आणि समजा त्यावेळी दुर्दैवानं मृत्यूसारखी अप्रिय घटना घडली तर घरातील हा कर्ता माणूसच मानसिक रूग्ण होऊ शकतो! त्यासाठी आपण आपल्या आरोग्याबाबत सदैव जागरूक राहणं आज नितांत गरजेचं आहे.

आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अनिवार्य झालेलं आहे. त्यासाठी पुरेसा व्यायाम करणे, जेवणाच्या वेळा पाळणे, बर्गर-पिझ्झासारखे फास्ट फूड टाळणे, सकाळी लवकर उठणे, रात्री जागरण न करता वेळेवर झोपणे अत्यंत गरजेचं आहे. आजकाल आपण बघतो, व्यायामासाठी जिकडेतिकडे ‘जिम’चे पेव फुटलेले आहे. अशा या जिममध्ये तुम्ही दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊ शकता. समजा सकाळी जमलं नाही तर सायंकाळी तेथे जायचा पर्याय खुला असतो. एका मर्यादेपर्यंत ते ठीक आहे पण आपल्या शरीरासाठी व्यायाम हा नियमितपणे करायला हवा आणि तोही आरोग्याच्या दृष्टीने सकाळच्या वेळी करणे जास्त हितावह आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र आजकाल जो-तो आपल्या मनाला येईल तसेच वागताना दिसतो. आता हेच बघा ना, अनेक जण सकाळी लवकर उठून फिरायला जाताना दिसतात. मात्र बहुतेक लोक मोबाईल जवळ बाळगतात. कित्येक जण तर अगदी कानाला हेडफोन लावून फिरताना दिसतात. कमीत कमी फिरायला जाताना, व्यायाम करताना तरी मोबाईलचा मोह टाळायला हवा असं वाटतं, जेणेकरून त्यावेळी एकाग्रता साधणे शक्य होऊ शकते. कारण योगासने, प्राणायाम करताना एकाग्रता साधणे खूप महत्त्वाचे असते. त्याचा आपल्या आरोग्यावर अनुकूल परिणाम होण्यासही मदत होते. 

सतत वाढणारी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची संख्या, निरनिराळ्या कारखान्यांचा धूर व दूषित पाणी तसेच प्लॅस्टिकचा बेसुमार वापर यामुळे वायुप्रदुषण व ध्वनिप्रदुषण कमालीचे वाढले आहे. त्याचप्रमाणे ‘ग्लोबल वाॅर्मिंग’च्या धोक्याची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहेच! या कारणांमुळेही आज सर्वसामान्य माणसाची प्रतिकार शक्ती कमी कमी होत चालली आहे यात शंका नाही. म्हणूनच कधी नव्हे इतकी आज आपल्या आरोग्याची काळजी घेणे, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आजघडीला अतिशय गरजेचं आहे. कोणातरी तज्ज्ञानं म्हटलंच आहे…”आरोग्यदायी शरीरातच चांगलं मन वास करतं!” त्याप्रमाणे आपणही त्यादृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न करूया आणि आपल्या आरोग्याबाबत सदैव जागरूक राहूया!!

आवो कदम से कदम मिलायेंगे सभी!
कल की राह ना देखो, आज और अभी!!

विनोद श्रा. पंचभाई, पुणे
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

25 Thoughts to “आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का? ”

  1. रमेश वाघ

    डोळे उघडलेत, मी तर मोबाईल शिवाय व्यायामच करत नाही.
    मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद

    1. Yogita Pardeshi

      खुप मार्गदर्शनपर लेख आहे. कर्क रोगाबद्दल जे लीहिले ते 100% सत्य आहे. कर्करोग़ाचे प्रमाण देशात खूपच वाढ़ले आहे. मार्च महीन्यात याच वर्षी कर्करोगाने माझी आई गेली, त्याच दरम्यान ताईच्या सासर्याला कैंसर diagnose झाला, मावशीला cancer झाला, 2 वर्षापूर्वी काका cancer ने गेले म्हनून आपल्या बोलन्यातिल सत्यता 100% पटते.
      कर्करोगासाठी कारणभूत अनेक कारणांपैकी खानपानाच्या अयोग्य सवयी, दैनंदिन जीवनात व्यायामाचा अभाव आणि अनुवंशिकता ही महत्वाची कारण आहेत. त्याच बरोबर नियमित आरोग्य तपासनी तितकीच गरजेची आहे.
      आईने 3/4 वर्षापासुन योगासन वर्गात जाने सोडले होते, खुप जूनी एसिडिटी ची प्रॉब्लम होती आनी कैंसर मुलेही एसिडिटी होते हे समजलेच नाही. एसिडिटीचीच दुनियाभरची औषधे घेत राहीली आणि जेंव्हा cancer बद्दल समजले तेंव्हा last stage सुरू होती l
      धन्यवाद सर लेख साठी 🙏🙏

  2. Vinod s. Panchbhai

    धन्यवाद पाटील सर!

  3. नितीन चव्हाण

    खूप छान लेख.. धन्यवाद..

  4. Prabhakar Chopkar

    सुंदर. अप्रतिम.विचार करायला लावनारी बाब. आता तरी जागरूक होऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.

  5. RPA Uipath Studio

    खरं आहे … मी व्यायाम चालू केला आहे .. आजचा व्यायाम उद्याचा मोफतचा विमा असतो… हल्ली प्राणायम करण्याचे प्रमाण वाढले पाहिजे… शेवटी ओरोग्यम धनसंपदा..! सत्य मांडले आहे पंचभाई सर .

  6. K R Barabhai

    फार छान माहीती दिली आहे .आजच्या जीवनात व्यायाम फार महत्वाचा आहे.पंचभाई साहेब समाज जागृती बद्दल अभिनंदन

  7. Arvind Krishnarao Pant

    उत्तम जागरूकता अभियान,मी नेहमी विचार करतो की छत्तीसगढ कामगारांची मुल कोणताही सकस आहार न घेता इतके सुदृढ कसे व शहरातील लोक आपल्या मुलांना सर्व सकस आहार देऊनही सुदृढ का नसतात तर त्याचे उत्तर आहे की ते निसर्ग नियमाशी मिळून असतात, आपले शेतकरी सुध्दा मीठ भाकर खाऊन सुध्दा रोगी नाहीत त्यांच्या शरीराची झीज जरूर होते, याचाच अर्थ असा की शरीराला अन्नाची जशी आवश्यकता आहे तशीच मेहनतीची सुध्दा गरज असते, परंतू पाश्चीमात्य संस्कृती च्या अंधानुकरणामुळे व अति सुखीसोयी च्या आहारी गेल्यामुळे आज ही स्थिति झाली आहे,आपण म्हणतो की आपले आयुष्यमान वाढले पहिले जे ६० वर्ष होते ते आज ८५ वर्षे आहेत परंतू आपण हा विचारच नाही करत की आज ७० टक्के नविन पिढी वयाच्या ४० शी नंतर औषधावरच जिवंत आहे शुगर, ब्लड प्रेशर ,हृदय विकार अशा आजारपण घेऊन ८५ वर्ष जगण्यात काय अर्थ म्हणून म्हणतात की “उम्र छोटी हुई तो क्या जिंदगी बडी होनी चाहिए” त्यामुळे स्वस्थ रहा नियमित व्यायाम करा व भरपूर जगा…

    1. Vijay fulzele

      सुंदर लेख. आजच्या युवकांना जीवनशैलीबद्दल धडा देण्यासाठी डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे. यानुसार वर्तन केल्यास चांगले आरोग्य लाभेल यात शंका नाही.

  8. रविंद्र कामठे

    भाई ह्या जिवन शैलीचे भोग मी सध्या भोगतो आहे. तुम्ही म्हणता तसे वेळेत डोळे उघडले तर ठिक नाही तर आहेच डाॕक्टरांची भरती.

    1. Vaishali Ritesh Deshmukh

      छान लेख

  9. प्रकाश भास्करवार,नागपूर

    आजच्या घडीला याच लेखाची आवश्यकता आहे. सत्य परिस्थिती
    अगदी सहज सांगितली व त्यावरील उपाय पण भरपूर सांगितले आहे. ते सहज करणे शक्य आहे.
    फारच चांगले सांगितले!!! धन्यवाद पंचभाई

  10. जयंत कुलकर्णी

    माऊली सुंदर लेख. नवीन पिढीच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम तुम्ही केले आहे. तरुण वयातील आरोग्याबाबत केलेली तडजोड उतार वयात नक्कीच घातक ठरते.

  11. गजानन मस्के

    खुप छान लेख

  12. Narendra darde

    फारच छान माहिती आहे

  13. Nagesh S Shewalkar

    विचारप्रवर्तक लेख आहे.

  14. संतोष मालुसरे

    खूप छान लेख. आजच्या घडीला तरी अशा माहितीपूर्ण लेखाची आवश्यकता आहे. आपण जी जीवनशैली जगतोय ती बरोबर आहे, असे प्रत्येकाला वाटते. सर आपण त्यातील नकळत होणाऱ्या चुकांबद्दल सत्य परिस्थिती दाखवून त्यावरील उपाय पण सहजपणे सांगितले. आरोग्यदृष्ट्या डोळ्यात अंजन घालणारा एक अप्रतिम लेख. सर या लेखाबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.

  15. संजय गोळे तपोवन सोसायटी वारजे पुणे

    फार छान माहीती दिली आहे .आजच्या जीवनात व्यायाम फार महत्वाचा आहे. समाज जागृती बद्दल अभिनंदन पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा

  16. hamid hussian

    एक दम दुरुस्त फ़रमाया आपने पंचभाई साहब व्यायाम बहोत ज़रूरी है आजकल की दिनचरिया के हिसाब से I am fully agreed with you

  17. Sandhya shinde

    आपले आरोग्य हे आपल्या जीवनशैलीचा आरसा आहे हे लेखावरून स्पष्ट होत आहे अगदी बरोबर आणि वास्तववादी लेखन केले आहे आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी आहार, व्यायाम मनाची शांतता अत्यंत महत्त्वाची आहे हे सविस्तर पणे आणि तळमळीने आपण सर्वांना सांगितले आहे कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर उपयुक्त आणि परिणामकारक लेखन केले आहे मनापासून अभिनंदन

  18. Joshi s. R.

    खूप छान माहिती आहे. यावरून सगळ्यांनी काळजी घ्यावी असा लेख आहे. लेखन छान केले आहे.

  19. Meghana Joshi

    खूप सुंदर लेख आहे. अभ्यास, चिकित्सा आणि मांडणी कौशल्य यांचा सुंदर मिलाप दिसतो विनोद तुझ्या लेखांमधून. वेगवेगळे विषय हाताळतोस तू. Keep it up 👍

  20. जागृती सारंग

    खुप छान वैचारीक लेख! सध्याच्या जीवनशैलीचे वास्तवदर्शी लेखन!

  21. अमोल नागपूरकर.नागपूर

    अमोल नागपूरकर,नागपूर
    निरोगी आरोगयासाठी आपल्या रोजच्या जीवनशैलीत परिवर्तन आणणे ही काळाची गरज आहे, कारण निरोगी आरोग्यपूर्ण जीवन हीच आयुष्याची संपत्ती आहे. यापुढे दुसरे काही नाही.. खूप छान लिखाण ..आपल्या सारख्या लेखकाचे दूरदृष्टी पणा नेहमी आमच्यासाठी प्रेरणादायी राहणार, खूप खूप शुभेच्छा..

  22. Pritam Sakhare

    Far chhan lekh aahe. Aajchya kalat prakrutibaddal sajag rahane far mahatwache aahe.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा