उद्ध्वस्त व्यक्तिमत्त्वाचे राज्य… महाराष्ट्र! – संजय सोनवणी

जसे माणसाला एक व्यक्तिमत्त्व असते तसेच व्यक्तिमत्त्व राज्य आणि राष्ट्राचेही असते. व्यक्तिच्या जीवनाचे अनुभव, अर्जित केलेले ज्ञान आणि त्याचा उपयोग करत समाजाला वा परिवाराला दिलेले योगदान, एकुणातील वागणे इ. बाबीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व ठरते. स्वत:ला जाणवणारे व्यक्तिमत्त्व आणि इतरांना भासणारे अथवा वाटणारे व्यक्तिमत्त्व यात जुळणारे सांधे असतातच असे नाही. तरीही एकुणात व्यक्तिमत्त्व ही बाब मानवी जीवनात महत्त्व घेऊन बसते. व्यक्तिला मिळणारा सन्मान अथवा त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष यामागे त्याचे एकुणातील व्यक्तिमत्त्व जबाबदार असते.

पुढे वाचा

वाचन ही ‘संस्कृती’ आहे काय? – घनश्याम पाटील

भारतीय भाषात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अशा श्रमिकांवर बरेच साहित्य लिहिले गेले. असे साहित्य ज्यांच्यावर लिहिले गेले त्यांना त्या साहित्याचा कधी काही फायदा झाला नाही, असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आहे. वाचनाने क्रांती झाली असती तर गीता, कुरान, बायबल वाचून लोक सुधारले नसते काय? रामायण-महाभारत अशा महाग्रंथातून त्यांनी काही बोध घेतला नसता काय? असाही प्रश्न उपस्थित केला जातो. बरं, ज्यांचं वाचन भरपूर आहे त्यांचा खूप विकास झाला असे तरी काही चित्र आहे का? जे आयुष्यभर भरपूर वाचतात ते मनाने किंवा धनाने खूप श्रीमंतच आहेत असंही चित्र नाही. मग तरूण, महाविद्यालयीन मुलं-मुली…

पुढे वाचा