वाचकमित्रांनो नमस्कार!
वैविध्यपूर्ण साहित्याने नटलेला ‘चपराक’चा दिवाळी विशेषांक सोमवार दि. 2 नोव्हेंबर 2015 रोजी आपल्या भेटीस येत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ह. मो. मराठे, नागनाथ कोत्तापल्ले, भाऊ तोरसेकर, प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, सुधीर गाडगीळ, प्रा. मिलिंद जोशी, सदानंद भणगे, पराग करंदीकर, अरूण खोरे, वासुदेव कुलकर्णी, शेखर जोशी, प्रा. रवींद्र शोभणे, प्रा. द. ता. भोसले, डॉ. न. म. जोशी, संजय सोनवणी, अंजली कुलकर्णी, श्रीराम पचिंद्रे, डॉ. भास्कर बडे, प्रा. श्रीपाल सबनीस, प्रा. बी. एन. चौधरी, सुधीर जोगळेकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, श्रीपाद ब्रह्मे, विद्या देवधर, सुवर्णा जाधव, उमेश सणस, मनिषा वाणी, विकास पाटील, आसावरी इंगळे, पराग पोतदार, प्रदीप नणंदकर, रवी घाटे, नरेंद्र नाईक, प्रशांत चव्हाण, सरिता कमळापूरकर, प्रल्हाद दुधाळ, समीर नेर्लेकर अशा एकाहून एक सरस साहित्यिकांच्या कलाकृतींनी नटलेला हा दिवाळी अंक आपल्या संग्रही हवाच.
या विक्रमी अंकाला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विक्रेत्यांकडे अंक शिल्लक राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे आपण प्रकाशनपूर्व नोंदणी करून आपली प्रत सुनिश्चित करा. या महाविशेषांकाचे मूल्य केवळ 250 रूपये असून नोंदणी करणार्यांना तो टपालाचा वेगळा खर्च न घेता याच रकमेत पाठवला जाईल. या सुविधेचा जरूर लाभ घ्या आणि वाचनानंद लुटत अक्षरदिवाळी साजरी करा!
आपणा सर्वांना ‘चपराक’ परिवाराकडून दीपावलीच्या आनंददायी शुभेच्छा!