सतत जळणारा आणि फुलणारा लोककवी

उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत.

पुढे वाचा

महाराष्ट्राचे ‘अमर’ लेणे!

महाराष्ट्र शाहीर अमर शेख यांचा जन्म 20 आक्टोबर 1916 चा. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचा. माता मुन्नेरबी यांच्या पोटी जन्मलेल्या ह्या कलावंताला सोबत मिळाल्या त्या दोन गोष्टी.

पुढे वाचा

व. पु. काळे – माझे दोस्त!

ही गोष्ट आहे २००७ ची. गांधीभवनाच्या पायर्‍यावर बसून आम्ही  यमुनामाईंनी केलेली पिठलं-भाकरी खाल्ली. लोककवी म. भा. चव्हाण हे आमचे ज्येष्ठ मित्र. ते व. पु. काळे यांच्या आठवणीने व्याकूळ झाले होते. त्यांना म्हटलं, ‘‘मभा, हे सगळं लिहून काढा. मी चपराकमध्ये छापतो.’’  ते म्हणाले, ‘‘लेखनाबाबत माझा महाआळशी स्वभाव तुम्हाला माहीतच आहे. इच्छा तीव्र आहे पण कागदावर कधी उतरेल माहीत नाही.’’  मग मी त्या भारावलेल्या अवस्थेतच माझ्या बॅगमधून कागद काढले. म. भा. मंत्रमुग्धपणे बोलत होते आणि माझ्याकडून झर्रझर्र ओळी कागदावर उमटत होत्या. का माहीत नाही, पण त्यावेळी हा लेख लिहून झाल्यावर मी खूप…

पुढे वाचा

वर्डस्वर्थ, यिट्स, शेक्सपिअर आणि मी

एकेकाळी वर्डस्वर्थ, डब्ल्यू. बी. यिट्स… या दिग्गजांच्या शब्दांनी मी भारावलो होतो. त्यांच्या कवितांनी मी आणि माझी कविता अक्षरश: वेडावलो होतो. त्यांच्या इंग्रजी कवितांबरोबरच मला इंग्रजी नाटकांनीही अंतर्बाह्य बदलवलं. त्यात अर्थातच विल्यम शेक्सपिअर प्रचंड भावला. साहित्य वाचण्याची गोडी माझ्यात मातृभाषेमुळंच निर्माण झाली खरी पण साहित्यजाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि सारा दृष्टिकोन बदलण्यासाठी इंग्रजी साहित्यानं माझ्यावर गारूड केलं…

पुढे वाचा