रंदागुली इमला

रंदागुली इमला

मारुतीच्या पारावर पाटील हसला की समोरच्या चार-पाच गल्लीत ऐकायला जात असे. त्याचं हसूच होतं तसं. तो खो-खो हसायचा. त्या हसण्यातसुद्धा एक प्रकारची जरब होती, धाक होता. उंचापुरं, धडधाकट शरीर त्याच्या हसण्याला साथ देत असे. अंगात पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच पांढरेशुभ्र धोतर आणि पायात करकर आवाज करणारे जोडे अशा थाटात पाटील गावातुन चालू लागला की बाया-बापड्या घराच्या बाहेर पडायलाही घाबरत असत.

पुढे वाचा

मुक्ताई

मुक्ताई

माधव गिर, पुणे चपराक मासिक, ऑक्टोबर 2011 मुक्ता! माझं बाळ ते! असे अस्पष्टसे उच्चार मुखातून बाहेर पडले खरे, पण त्याच वेळी विट्ठलपंत हळूच उद्गारले. ‘रूक्मिणी, चल आता. सावर स्वत:ला ‘हो, चलावं! रूक्मिणीनी होकार भरला पण तिचा पायमात्र तेथून हलत नव्हता. ‘रूक्मिणी, अगं, आपण हे सर्व आपल्या मुलांसाठीच तर करतो आहोत ना.’ विट्ठलपंत समजूतीच्या सुरात बोलले.

पुढे वाचा

शेतीबाडीच्या कविता

साहित्य चपराक’चे सहसंपादक आणि प्रतिभावंत कवी माधव गिर यांचे ‘नवं तांबडं फुटेल’ आणि ‘शेतीबाडी’ हे दोन अस्सल कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांना प्रचंड वाचकप्रियता लाभली. शेती आणि शेतकर्‍यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘शेतीबाडी’ या अष्टाक्षरी खंडकाव्यात त्यांनी अनेक प्रश्‍न सुहृदयतेने हाताळले आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत असलेले गिर सर स्वतः शेतकरी असल्याने त्यात शेतकर्‍यांच्या सुखदुःखाचे प्रतिबिंब लखलखीतपणे उमटले आहे. सध्याच्या शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमिवर त्यांच्या ‘शेतीबाडी’तील काही रचना खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी. आपल्याला त्या आवडतील याची खात्री आहेच. या कवितांवरील  आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा; तसेच या कविता जास्तीत जास्त शेअर करा. जातीचा मी शेतकरी                                      …

पुढे वाचा