जिजाऊ

कसे व्हावे संगोपण कसे पुत्र घडवावे जेव्हा प्रश्न हे पडती उल्लेख फक्त तिचा! तिचे दिव्य ते संस्कार झाला शिवबा साकार जशी दैवी ती कुंभार अशी राजमाता जिजा!

पुढे वाचा

नायिका

न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मति: । भवन्ति कृत पुण्यानाम् भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ॥ श्रीसूक्तामधील वरील ऋचा सांगते की श्रीसूक्ताच्या पठणाने, पुण्यवान भक्ताच्या मनात, राग-लोभ-मत्सर इत्यादी वाईट विचार येत नाहीत! तिला मी कधी श्रीसूक्त म्हणताना पाहीले नाही परंतु वरील सर्व वर्णन तिला तंतोतंत लागु पडत होते. अर्थात हे आता एवढ्या वर्षांच्या आयुष्याच्या अनुभवाने समजते आहे. त्यावेळी तिच्यामधील हे मोठेपण समजण्याची आमची पात्रता नव्हती असंच म्हणावं लागेल. ‘ती’ म्हणजे माझी आजी, माझ्या आईची आई जिने आई बनून आमच्या शैक्षणिक वर्षांत आम्हांला सांभाळले, ती विलक्षण बाई!! तिची ओळख करुन…

पुढे वाचा

अद्वितीय योध्दा संन्यासी… स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. लहानपणी त्यांचे नाव नरेंद्रनाथ असे ठेवण्यात आले होते. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकात्याच्या हायकोर्टात एक प्रसिद्ध वकील म्हणून कार्यरत होते. ते पाश्चात्य सभ्यतेवर विश्वास ठेवणारे होते. मात्र नरेंद्रची आई भुवनेश्वरीदेवी या धार्मिक विचाराने वागणाऱ्या गृहिणी होत्या. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा भगवान शिवजी यांच्या भक्तीमध्ये जात होता. लहानपणापासूनच विवेकानंद खूप हुशार आणि खोडकर होते. ते आपल्या सोबतच्या मुलांबरोबर चेष्टा मस्करी करायचे आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते आपल्या शिक्षकांसोबत देखील चेष्टा करण्यास मागे-पुढे बघत नव्हते. त्यांच्या घरात नियमित…

पुढे वाचा