वाटेवरच्या मशाली

वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! त्यामुळे उगीच शब्दांचे अवडंबर न माजवता, फाफटपसारा टाळून रंजकपणे थोडक्यात विषय मांडणे महत्त्वाचे असते.

पुढे वाचा

नायिका

न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मति: । भवन्ति कृत पुण्यानाम् भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ॥ श्रीसूक्तामधील वरील ऋचा सांगते की श्रीसूक्ताच्या पठणाने, पुण्यवान भक्ताच्या मनात, राग-लोभ-मत्सर इत्यादी वाईट विचार येत नाहीत! तिला मी कधी श्रीसूक्त म्हणताना पाहीले नाही परंतु वरील सर्व वर्णन तिला तंतोतंत लागु पडत होते. अर्थात हे आता एवढ्या वर्षांच्या आयुष्याच्या अनुभवाने समजते आहे. त्यावेळी तिच्यामधील हे मोठेपण समजण्याची आमची पात्रता नव्हती असंच म्हणावं लागेल. ‘ती’ म्हणजे माझी आजी, माझ्या आईची आई जिने आई बनून आमच्या शैक्षणिक वर्षांत आम्हांला सांभाळले, ती विलक्षण बाई!! तिची ओळख करुन…

पुढे वाचा