भाजपच्या नगरसेविका कोंढरे यांचा निषेध

भाजपच्या नगरसेविका कोंढरे यांचा निषेध

पुणे, (प्रतिनिधी) : ज्या नगरसेकांना पुण्यासारख्या सुसंस्कृत लोकांनी लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिले अशा जबाबदार नगरसेविकेने डॉक्टरांना मारहाण करणे ही समाजाच्या दृष्टिने अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. अशा प्रकारात डॉक्टरांच्या संरक्षणासाठी जो कायदा करण्यात आला आहे त्या कायद्याच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. ही कारवाई झाल्यास समाजामध्ये डॉक्टरांविषयीचा आदर टिकून राहण्यास मदत होईल; तसेच डॉक्टरांना रूग्णसेवा करताना कुठल्याही भीतीखाली काम करण्याची दहशत राहणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी व्यक्त केले.

भाजपच्या नगरसेविका सौ. आरती कोंढरे यांचा आम्ही निषेध करीत आहोत आणि डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्टनुसार त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. कोंढरे यांच्यावर त्वरीत कारवाई न झाल्यास डॉक्टरांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही डॉ. जगताप यांनी दिला आहे.

एन. सी. पी. डॉक्टर सेलतर्फे डॉक्टरांवर हल्ला करणार्‍या नगरसेविकेवर डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्टनुसार कारवाईची मागणी करताना डॉ. सुनील जगताप यांच्यासह डॉक्टर सेल पुणेचे कार्याध्यक्ष डॉ. राजेश पवार, उपाध्यक्ष डॉ. अजित पाटील, डॉ. सिद्धार्थ जाधव, सचिव डॉ. हेमंत तुसे, डॉ. राहुल सूर्यवंशी, डॉ. दत्तात्रय गायकवाड, डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. प्रदीप उरसळ, डॉ. प्रताप ठुबे, डॉ. सुनीता काळे, डॉ. सुलक्षणा जगताप, डॉ. सुजाता वरगाळे, डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. विजय वाळद, डॉ. सुहास लोंढे, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. परशुराम सूर्यवंशी, डॉ. मुस्ताफ तांबोळी, डॉ. नितीन पाटील आदींनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा