आजकाल कोणी साधा ग्रामपंचायतीचा सदस्य असला तरी त्याचा रूबाब पाहण्यासारखा असतो. गाडी, माडी, कार्यकर्त्यांचा लवाजमा अशा थाटात तो जगत असतो. पुणे जिल्ह्यातील मंचर या गावात मात्र दंतकथा वाटावी असा एक अवलीया राहायचा. तीन वेळा आमदार, खासदार असूनही अविश्वसनीय वाटावा असा त्यांचा साधेपणा. ते आमदार असताना त्यांच्या पत्नी मथुराबाई दुष्काळी कामावर रोजंदारीने जायच्या. गोधड्या शिवून त्या विकायच्या आणि आपला प्रपंच चालवायच्या. किसणराव बाणखेलेअण्णा हे त्यांचं नाव. ते 1989च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. त्यापूर्वी 1972, 1980 आणि 1985च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून…
पुढे वाचा