सध्या प्रसारमाध्यमांद्वारे सर्वात जास्त चर्चिल्या जाणार्या ‘असहिष्णुता’ या शब्दाच्या मुळाशी जाताना आधी हा ज्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे त्या ‘सहिष्णुता’ या शब्दाकडे लक्ष द्यायला हवे. मुळात इंग्रजी प्रसारमाध्यमांनी चर्चेत आणलेल्या ‘टॉलरन्स’ या इंग्रजी शब्दाचे हे मराठी भाषांतर आहे. सध्या भारतात असहिष्णुता आहे की नाही, यावर मोठा वाद चालू आहे आणि नजिकच्या भविष्यकाळात हा वाद संपुष्टात येण्याचे काहीच चिन्ह दिसत नाही. यातही वैशिष्ट्यपूर्ण भाग असा की, दोन्ही बाजूंचे प्रतिद्वंद्वी असहिष्णुता आहे की नाही यावरच मोठ्या हिरीरीने वाद घालत आहेत.
पुढे वाचा