माझी आशुताई : गुणांचे अदभुत रसायन

‘चपराक’ परिवाराच्या लेखिका आशा दत्ताजी शिंदे (ज्यांना आम्ही ‘आशाई’ म्हणतो) त्यांचा आज ऐंशीवा वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या भगिनी सौ. ज्ञानदा चिटणीस यांचा हा विशेष लेख. आशाईंना उत्तम आणि निरोगी दीर्घायुरारोग्य लाभावे ही प्रार्थना. गुणांचे अदभुत रसायन माझी आशुताई !! —————————– क्रीडा साहित्य व्यवसायातील पहिली यशस्वी महाराष्ट्रीयन महिला म्हणून जिचा सर्वत्र गौरव केला जातो, ती पुण्याच्या शिंदे स्पोर्ट्स ची ” आशा शिंदे” म्हणजे आम्हा ५ प्रधान भावंडांच्या पैकी २ नंबरची बहीण,माझी आशूताई!! ताईबद्दल लिहिण्यासाठी हातात लेखणी घेतली खरी,पण तिच्याबद्दल काय आणि किती लिहावे ? हेच समजेना.इतके तिचे कार्य मोठे आहे.

पुढे वाचा

साहित्यिक दुष्काळ निवारणारे ‘द.ता.’

आम्हाला गुरुजींनी व्याकरण शिकवताना तीन काळ शिकवले. वर्तमानकाळ सोडला तर बाकीच्या दोन्ही काळांशी आमचा संबंध येत नव्हता. शाळा पूर्ण झाली आणि आम्हाला आणखी एका काळाला सामोरं जावं लागलं. तो काळ म्हणजे ‘दुष्काळ…!’ असं जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडणारे पंढरपूर येथील ज्येष्ठ लेखक डॉ. द. ता. भोसले म्हणजे एक चालतंबोलतं विद्यापीठच म्हणायला हवं. ग्रामीण साहित्याच्या प्रांतात त्यांनी फक्त यथेच्छ मुशाफिरीच केली नाही तर खेड्यापाड्यातील अनेक लिहित्या अंकुरांना त्यांनी बळ दिलं आणि त्यातले अनेकजण आज डौलदार वृक्ष म्हणून साहित्यशारदेच्या दरबारात प्रभावीपणे पुढं आलेत. 8 मे 1935ला जन्मलेल्या भोसले सरांचा व्यासंग अफाट आहे. रयत शिक्षण…

पुढे वाचा