पत्रकारितेच्या धर्मात पक्षपाताचा अधर्म! – आबा माळकर

‘चपराक’चे संपादक आणि माझे मित्र घनश्याम पाटील यांचा फोन आला. तसे आमचे नियमित संभाषण आणि फोन असतो; पण त्या दिवशी घनश्याम थेट म्हणाले, ‘‘आबा, तुम्ही पक्षपाती आहात काय…?’’ त्यांचे हे शब्द कानावर पडले आणि काळजात चर्रर… झालं. क्षणभर घनश्याम माझ्यावर आरोप करताहेत असं वाटलं. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्नही डोक्यात चमकून केला. अर्थात हे काही सेकंदात झालं. काही सेकंदात मन कुठे, कुठे भटकत जातं, याचा प्रत्यय पुन्हा आला. शरीर थरथरायला लागलं. त्यावरून तरी आपण भरकटोय असं जाणवत होतं. त्यानंतर घनश्याम यांनी ‘‘तो दिवाळी अंकासाठी विषय आहे, त्यावर लिहा,’’ असं सांगितल्यानं मन टाळ्यावर आलं; पण शरीराचं थरथरणं काही थांबलं…

पुढे वाचा

मी एक संभ्रमीत – प्रवीण दवणे

राजकारण असो की समाजकारण, साहित्य असो की सांस्कृतिक वातावरण पदोपदी संभ्रमाचे भोवरे आहेत, चकव्यात हरवावे आणि आपल्याच घराचा रस्ता आपल्याला सापडू नये असे बेसुमार वातावरण आहे. सामान्य माणूस म्हणून आजच्या वर्तमानाचे फक्त काही संभ्रम मांडण्याचा हा प्रयत्न. घटना प्रातिनिधिक आहेत, याला समांतर असंख्य घटना घडतच आहेत. लिहिणार किती नि सांगणार कोणाला?  आणि कोणाकोणाला? कुंपणच शेत खातंय, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, हे बालपणी मराठी पुस्तकात वाचलेले म्हणी व वाक्प्रचार आपण सत्यात जगत आहोत.

पुढे वाचा

मराठी माणसाचा ‘शेअर’ चढताच!

‘मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे पडतो’, असं म्हटलं जातं. हे खरं आहे का? शेअर मार्केटमध्येही गुजराती-मारवाडी माणूसच पुढे आहे, असा गैरसमज उराशी बाळगून अनेकजण न्यूनगंडात का राहतात? मराठी माणसाचा शेअर नेमका कसा आणि किती वाढतो आहे, याबाबतचा डोळे उघडणारा आणि सकारात्मक चर्चा करणारा हा लेख. कालनिर्णयचे संचालक श्री. जयेंद्र साळगांवकर यांनी टिपलेले हे वास्तव निश्चितच प्रेरणादायी आहे. जरूर ऐका. अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी ‘चपराक’ युट्युब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा…

पुढे वाचा