‘चपराक’चे संपादक आणि माझे मित्र घनश्याम पाटील यांचा फोन आला. तसे आमचे नियमित संभाषण आणि फोन असतो; पण त्या दिवशी घनश्याम थेट म्हणाले, ‘‘आबा, तुम्ही पक्षपाती आहात काय…?’’ त्यांचे हे शब्द कानावर पडले आणि काळजात चर्रर… झालं. क्षणभर घनश्याम माझ्यावर आरोप करताहेत असं वाटलं. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्नही डोक्यात चमकून केला. अर्थात हे काही सेकंदात झालं. काही सेकंदात मन कुठे, कुठे भटकत जातं, याचा प्रत्यय पुन्हा आला. शरीर थरथरायला लागलं. त्यावरून तरी आपण भरकटोय असं जाणवत होतं. त्यानंतर घनश्याम यांनी ‘‘तो दिवाळी अंकासाठी विषय आहे, त्यावर लिहा,’’ असं सांगितल्यानं मन टाळ्यावर आलं; पण शरीराचं थरथरणं काही थांबलं…
पुढे वाचा