ज्ञानाचा दिवा, घरोघरी लावा

ज्ञानाचा दिवा, घरोघरी लावा

“दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे… इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतीक रम्य शुभंकर हे… चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे… त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे”

पुढे वाचा

विद्यार्थ्यानो, अपयश म्हणजे तात्पुरती माघार असते, तो अंतिम टप्पा नसतो.

देशात दहावी-बारावीच्या निकालादरम्यान हजारो विद्यार्थी आत्महत्या करतात. अपयश आल्याने किंवा अपयश येण्याच्या भीतीने. अपयश ह्या शब्दातच यश आहे. तुम्ही अपयशी झालात म्हणजे तुमचं ते पूर्णपणे अपयश नसतं, त्या अपयशातूनही तुम्ही काहीनाकाही यश मिळवलेलं असतं, नक्कीच. अपयश हा अंतिम टप्पा नसतो, तो फक्त एक अडथळा असतो तात्पुरता. कुठल्याही अपयशावर आत्महत्या हा तोडगा नाही, अपयश पचवायला शिकलं पाहिजे. तुम्ही हारलात हे बघू नका, तुम्ही खेळलात हे बघा. कुठल्याही परीक्षेत नापास होणं म्हणजे आयुष्यातलं सगळं संपलंं असं नाही. तुम्हाला जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं आहे… तेव्हाच खरी सुरुवात झालेली असते. परीक्षा रद्द…

पुढे वाचा