आईचं पत्र हरवलं!

आईचं पत्र हरवलं!

माझ्या आईचं पत्र हरवलं! ——————————— ‘माझ्या आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ असा एक खेळ आम्ही लहानपणी खेळत होतो. टी व्ही आणि मोबाईल नसलेल्या त्या काळात मैदानी खेळांना प्राधान्य असायचं. क्वचितच आम्ही मुलं घरात असायचो! आंधळी कोशिंबीर, ऊन सावली, डोंगर का पाणी, डबा ऐसपैस, हुतुतू, आट्यापाट्या, गोट्या, भोवरा, लपाछपी, विषामृत, विटी दांडू असे इतर खेळही त्यावेळी आम्ही खेळत होतो. कदाचित आजच्या मुलांना यातील काही खेळांची नावं, ऐकून देखील माहिती नसतील. पण तुमच्या आई-बाबांना, आजी -आजोबांना विचाराल तर ते भरभरून बोलतील या खेळांवर आणि जुन्या काळातील आठवणीत रमूनही जातील! या खेळांना…

पुढे वाचा

आईचं पत्र हरवलं…

आईचं पत्र हरवलं...

चपराक दिवाळी 2020 सणासुदीचे दिवस होते. वर्गातील पाच-सहा विद्यार्थी आज अनुपस्थित होते. काहीजण आईबाबांसोबत खरेदीला गेले होते. काही जवळच्या देवदेवतांच्या दर्शनासाठी गेले होते. वर्गात हजर असणार्‍या मुलांची मानसिकता आज जरा निराळीच होती! मित्र-मैत्रिणी आले नाहीत म्हणून कुणी उदास होतं तर कुणी उगाच चुळबुळ करत होतं! सकाळ सत्रात एक कविता शिकवून झाली होती. बर्‍याच जणांनी ती पाठही केली होती!

पुढे वाचा