गोष्ट गुगलची

Gosht-Googlechi by Ganesh Aatkale

या एक-दीड दशकात वाचणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे या क्रियापदांसारखे अजून एक क्रियापद आपल्याला ऐकायला मिळते, ते म्हणजे गुगल करणे! अर्थात ‘गुगल’वर शोधणे. गुगल या कंपनीचं नाव माहीत नसलेला एक साक्षर माणूस सापडणार नाही, अगदी असंच गुगलबद्दलचं चित्र आहे. आजच्या युगात गुगल म्हणजे एक माहितीचं भांडार आहे. कशाबद्दलही माहिती शोधायची असली की मग गुगल उघडा, अगदी इंटरनेट चालू आहे की नाही हेही तपासण्यासाठी लोक गुगलच उघडतात. एखादं ठिकाण शोधायचं असेल, मग गुगल मॅप्स वापरा. कोणतं पुस्तक मिळवायचं असेल तर गुगल बुक्स वापरा. ई-मेल खातं उघडायचं असेल गुगलचेच जीमेल वापरा. इंटरनेटवर एखादा…

पुढे वाचा