उबुंटु : एक सामूहिक जीवनपद्धती

जगातला सर्वात मागासलेला खंड म्हणून आपण आज आफ्रिकेकडे पाहतो. नायजेरिया, काँगो, इथिओपिया ह्यासारखे मागासलेले देश, सतत चालणारी यादवी युद्धे, कुपोषणाचे बळी ठरणारी लहान मुले, असहाय्य महिला आणि वृद्धांची केविलवाणी धडपड ही आफ्रिकेच्या संदर्भातली आपल्या डोळ्यासमोर उभी राहणारी दृश्ये आहेत. ही काही आफ्रिकेची खरीखुरी ओळख मानता येणार नाही. आजचा हा दयनीय वाटणारा भूभाग मानवी संस्कृतीच्या पहाटेच्या काळात सर्व जगाच्या पुढे होता व त्याच्या विकासाच्या प्रकाशात बाकीच्या जगाने विकासाची वाट शोधली होती, हे मुद्दाम सांगितलेच पाहिजे. मानववंशाची सुरूवातच आफ्रिकेत झाली असे अभ्यासक मानतात.

पुढे वाचा

गाव हरवलं आहे!

नांगरून ठेवलेल्या शेतावर जरा हलकासा पाऊस पडून गेला की, मातीची ढेकळं फुटतात आणि काळ्याभोर मातीचा मऊशार, मोहक गालिचा तयार होतो. या मातीवरून कोणी वावराच्या मध्यभागातून या बांधापासून त्या बांधापर्यंत चालत गेलं की, वावराच्या मध्यभागी एका विशिष्ट लयीत पावलांचे मोहक ठसे उमटतात.

पुढे वाचा

खडतर प्रवासाची प्रेरक कथा

अवघ्या एका रूपयांसाठी तुंबलेली गटारं साफ करणं, उकिरडे तोडणं, शेतमजुरी करणं, दारूच्या दुकानात काम करणं, शिक्षणासाठी मित्राच्या रूममध्ये रहायला मिळावं म्हणून धुणी-भांडी, स्वयंपाक करणं, पायात शूज नाहीत म्हणून अनवाणी पळणं, मेडिकल टेस्ट करण्यासाठी पैसे नसल्यानं भाजी मंडईत हमाली करणं हे सगळं खरंच सोपं नसतं. हे सगळं का करायचं? तर आयुष्याची दिशा ठरली होती की काहीही झालं तरी भारतीय सैन्य दलात सहभागी होऊन देशाची सेवा करायची… भारतीय सेनेतील जवान ते कर्नल या अधिकारी पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. सामान्य माणसाचा यशस्वी संघर्ष यापेक्षा सर्वश्रेष्ठ साहित्य ते कोणते? म्हणूनच…

पुढे वाचा