सुभाष ते नेताजी : एक साहसी गरूडझेप

– श्रीराम पचिंद्रे 7350009433 ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 ओडिशाची राजधानी कटक येथे नामवंत वकील जानकीनाथ बोस वकिली करायचे. जानकीनाथांची कोलकत्त्यात मोठी वास्तू होती. ते कटकहून कोलकत्त्याच्या उच्च न्यायालयात वारंवार यायचे. त्या निमित्तानं घरी येऊन मुलांशी संवाद साधता यायचा. त्यांचे सतीश हे पहिले पुत्र. शरदचंद्र हे दुसरे पुत्र. ते इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊन आले होते. ते उच्च न्यायालयात उत्तम प्रकारे वकिली करायचे. सुभाष हे जानकीनाथांचे आठवे पुत्र. ते बी. ए. झाले होते.

पुढे वाचा

नेताजी सुभाषचंद्र बोस … अद्वितीय स्वातंत्र्यसेनानी

नेताजी सुभाषचंद्र बोस ... अद्वितीय स्वातंत्र्यसेनानी

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर महापुरुषांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीला लाभलेले अनमोल नररत्न होते. त्यांचं वक्तृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की समोरची साधारण व्यक्ती आपसूकच त्यांच्याशी आणि त्यानंतर स्वातंत्र्यलढ्याशी जोडली जायची! त्याकाळी सुभाषबाबूंनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उचलायला लावणारं आहे. म्हणूनच त्याकाळी ब्रिटिश सरकारला सुध्दा त्यांची दहशत वाटत होती!

पुढे वाचा