चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचा हा दिवाळी अंक मागविण्यासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 पूर्वीच्या काळी राजेरजवाड्यांच्या घराण्यांमध्ये एक रीतीरिवाज होता. राजवाड्यामध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले की त्याची जन्मकुंडली मांडली जात असे. त्याबरोबरच त्याची आयुर्मर्यादा कशी असेल? त्याचे आरोग्य कसे असेल? यांचे त्या नवजात अर्भकाच्या शरीरयष्टीवरून परीक्षण केले जाई.
पुढे वाचाTag: aayurved
आरोग्य तरंग – मनातील वसंतोत्सव
शिशिरातील पानगळी पाठोपाठ नवांकुरांसाठी अवकाश निर्माण होते. फांद्याफांद्यावर पानांचे नवे कोंब दिसायला लागतात. एरवी बोचणारी थंडी जरा कमी होऊ लागते. वातावरण उबदार होते. थंडीने आखडलेले शरीर देखील हळूहळू मोकळे व्हायला लागते. धमन्यांमधून रक्ताच्या रुपाने वाहणारा जीवनरस वसंतऋतुच्या आगमनाबरोबर मनालाही प्रफुल्लित करतो. त्यातच भर पडते ती वसंतऋतुमधे फुलणार्या निरनिराळ्या रंगीबेरंगी फुलांची. निसर्गातील हा रंगोत्सव, आनंदाचा संदेश घेऊन येतो. आपल्या ‘आरोग्यतरंग’ या सदराची सुरुवात मार्च 2018 मधे वसंत ऋतुच्या स्वागताने झाली. वर्षभरात आपण वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या सहा ऋतुत मानवी शरीराचा निसर्गाशी असलेला संबंध आणि आपले आरोग्य यांचा…
पुढे वाचा