इंदिरा गांधी यांची सभा झाली; पण…

शरद पवार यांच्यामुळे बारामती देशात नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे. 1980 साली विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार काँग्रेस एसचे उमेदवार होते. त्यांच्याविरूद्ध तिथून मारूतराव चोपडे यांनी काँग्रेस आयच्या वतीने लढत दिली. त्यावेळी शरद पवार बारामतीतून पडतील, असा कयास असल्याने ही निवडणूक देशपातळीवर चर्चेत आली होती. त्यावेळी प्रेमलाकाकी चव्हाण या काँग्रेस आयच्या प्रांतअध्यक्ष होत्या. प्रेमलाकाकी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई. भाई गुलाम अली जिल्हाध्यक्ष तर किरण गुजर हे बारामती शहराचे अध्यक्ष होते. मारूतराव चोपडे हे धनगर समाजाचे मोठे प्रस्थ होते. ‘बारामती विधानसभा मतदारसंघात या समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे इंदिरा गांधी यांची सभा झाली…

पुढे वाचा