कॅमेर्‍याचे पांग फेडणारा छायादिग्दर्शक – राहुल जनार्दन जाधव

जर तुमच्यापुढे ‘गलेलठ्ठ पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी’ आणि ‘आवडीच्या पण अनिश्चित क्षेत्रातील सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या दोन प्रस्तावांपैकी  एक स्वीकारण्याचा पर्याय असेल तर कोणता निवडाल? विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे! पण त्याने मात्र वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एम.पी.एस.सी. पास करून मिळवलेल्या सरकारी नोकरीपुढे छायाचित्रकाराचा सहाय्यक होणे निवडले. 80च्या दशकात असा निर्णय घेणे चौकटीबाहेरचे होते. त्यावेळी छायाचित्रकलेकडे पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून क्वचितच पाहिले जायचे. तरीही पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याचा…

पुढे वाचा

एसटीचा संप मिटला! कर्मचारी आणि लालपरीच्या आवाजाचं काय?

यंदा ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी विलीनीकरण, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक मागण्या घेऊन संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यावेळी अनेक चाकरमानी, विद्यार्थी, कामगार दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या गावी जायला निघाले होते, त्यांना या संपाचा मोठा फटका बसला. एसटी बंद म्हटल्यावर खाजगी वाहतुकीची चांदी होणार हे गृहीतच होतं. सर्वसामान्यांचा कुठलाच विचार न करता खाजगी लोकांनी तिकिटाचे दर भरमसाठ वाढवले. त्यातून गरीब जनतेचे मोठे आर्थिक शोषण झाले. मागच्या तीन-चार वर्षाचा विचार करता हा संपही दोन-तीन दिवसात मिटेल असे वाटत होते, मात्र गेल्या संपात तोंडी आश्वासनं सोडली तर आपल्या हाती ठोस असं काहीच…

पुढे वाचा