गांधीजींचे पुनरागमन

गांधीजींचे पुनरागमन सुसाट आणि पिसाट माणसाला रोखणारी प्रेरणा… विविध भाषिक व पंथीय स्वरूपात आपले गट करून राहणार्‍या भारतीयांना एकत्र आणण्याचा आणि लढ्यासाठी, न्यायासाठी एकत्रित उभे करण्याचा गांधीजींचा प्रयत्न हा अभिनव तर होताच पण त्याचे मानवी इतिहासातील महत्त्वही अधोरेखित केले पाहिजे. काही हजार लोक पोलिसांची व लष्कराची भीती न बाळगता एकत्र येतात आणि लढा पुढे नेतात, हेच एक अजब आश्चर्य होते.

पुढे वाचा

अशी ही सातार्‍याची तर्‍हा

‘अजिंक्यतारा’ किल्ल्याच्या कुशीत वसलेलं, प्राचीन-ऐतिहासिक वारसा लाभलेलं ‘सातारा’ दक्षिण महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर! छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्या’चं ‘तोरण’ बांधलं ते याच भूमीतल्या ‘रायरेश्वर’च्या पठारावर! ‘स्वराज्या’चा नाश करण्यासाठी आलेल्या आदिलशाही सरदार अफझलखानाचा वध छ. शिवरायांनी प्रतापगडच्या पायथ्याशी केला. ‘स्वराज्या’च्या सीमा अरबी समुद्रापर्यंत भिडवल्या, त्या ऐतिहासिक घटनेची साक्षीदार असलेली भूमी हीच! सरसेनापती प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते याच भूमीतले! आलमगीर औरंगजेबाला शूर मराठ्यांनी झुंजवलं, त्याच्या मोगल साम्राज्याला खग्रास ग्रहण लागलं तेही याच परिसरात! १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या निधड्या-निर्भय सहकार्‍यांनी ‘ब्रिटिशांची’ सत्ता उखडून टाकून ‘पत्री सरकार’ स्थापन केलं होतं, तेही याच परिसरात!…

पुढे वाचा