आधुनिक ऋषी म. म. यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे

आधुनिक ऋषी म. म. यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे

स्तुतिर्नैव यस्मै कदा रोचते च । धनं चा पि तस्मै विषं वै सदा च ॥ सदाचार वृत्तं हि यस्यामृतं च । नमामो वयं तं हि यज्ञेश्‍वरं च ॥ आजच्या काळात कोणाला ऋषी कसे होते याचे प्रत्यक्ष दर्शन करावयाचे असल्यास त्यांनी श्रीचतुर्वेदेश्‍वरधाम सावरगांव येथे परमादरणीय प्रातःस्मरणीय महामहोपाध्याय यज्ञेश्‍वरशास्त्री कस्तुरे गुरूजी यांचे दर्शन घ्यावे. अत्यंत तेजःपुज गौरवर्णांकित शरीर, गंभीर मुद्रा, ज्ञान आणि त्याग याचा एकत्रित झालेला समन्वय, नेत्रातील एक वेगळीच चमक, शांत, प्रसन्न, मुखमंडल पाहिले की हे कोणीतरी सत्ययुगातले वसिष्ठ अथवा वामदेवच अवतरले आहेत असा भास मनाला होत असे आणि अत्यंत नास्तिकही…

पुढे वाचा