जगातील सर्वाधिक उत्तुंग मनोरे कोणते? असा प्रश्न मला कधी पडतच नाही. हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे आपल्या राष्ट्रानं जगाला अनेक भव्यदिव्य मनोरे दिलेत. या मनोऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्त्वानं त्यांची उंची आपापल्या क्षेत्रात सातत्यानं दाखुवून दिली. महाकवी केशवसुत ते मर्ढेकर या परंपरेचा विचार करता असाच एक बलदंड मनोरा मला खुणावतो, भुरळ पाडतो. या विलक्षण प्रतिभेच्या मनोऱ्याचं नाव म्हणजे लोककवी मनमोहन नातू! ११-११-१९११ ला जन्मलेल्या मनमोहनांनी ७ मे १९९१ ला जगाचा निरोप घेतला; मात्र त्यांच्या साहित्यिक योगदानातून हा प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी कायम धगधगत आहे. कुणी शाईने लिहिली कविता कुणी रक्ताने लिहिली कविता करी…
पुढे वाचा