हे देवाघरचे देणे!

प्रेम नाही मिळाले म्हणून द्वेष? घृणा? सूड? मग प्रेमच कसले? अलीकडच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना पाहिले की मन सुन्न होते आणि विचारात पडते की इतक्या खालच्या पातळीवर जाईपर्यंत माणसाचा आत्मा, विवेक, त्याच्यातील दयाभाव कसा काय झोपू शकतो? की या सगळ्याला जागे ठेवण्याच्या अभ्यासात/जागरणात समाज आणि संस्कृतीचा सहभाग कमी व्हायला लागलाय?

पुढे वाचा

सराव थांबला, साक्षात्कार हुकला…

आजूबाजूच्या घटना निराश करत असताना, यश हूल देऊन दूर जात असताना, कष्टाने रचलेले इमले डोळ्यादेखत जमीनदोस्त होत असतानादेखील ज्याच्या वागण्यातून सकारात्मकता झळकते त्याला लोकं आज वेडा, स्वप्नाळू म्हणतात, पण उद्या त्याचीच एक यशस्वी माणूस म्हणून उदाहरणं देतात.

पुढे वाचा