शरद जोशींची दुसरी बाजू!

शरद जोशींची दुसरी बाजू!

‘शरद जोशी-शोध अस्वस्थ कल्लोळाचा!’ हे वसुंधरा काशीकर-भागवत यांनी लिहिलेले शरद जोशींच्या 17/18 वर्षांच्या सहवासात त्यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारे पुस्तक आहे. शरद जोशींच्या आयुष्याची दुसरी बाजू जी समाजासमोर कधीही आली नाही, ती आपणास काशीकरांच्या लिखाणातून वाचायला मिळते. युनोतली प्रतिष्ठेची, पैशांची, सुखासीन नोकरी. युरोपातील सुसंस्कृत, समृद्ध, सुखी आयुष्य. ज्यात निश्‍चितता आहे, सुरक्षितता आहे ती सोडून दोन मुली, बायको सगळ्यांना घेऊन भारतात आले. केवळ भारतातल्या शेतकर्‍याचा विचार मनात घेऊन. महाराष्ट्रात येऊन कोरडवाहू शेती करायची. शेतकर्‍याच्या दारिद्य्राची कारणे शोधून उपाययोजना करावयाची. त्यासाठीच जमीन घ्यावयाची. अनेकांनी त्यांना वेड्यात काढावे अशीच परिस्थिती होती. एक…

पुढे वाचा