महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटीहून अधिक आहे. जगभरात दहा कोटीहून अधिक मराठी भाषिक आहेत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्या दहा भाषांत मराठी आहे. मराठी भाषेचा इतिहास हा हजार ते बारा वर्षांचा आहे, अशा गोष्टी आम्ही अभिमानाने सांगतो! मात्र केवळ साहित्यनिर्मितीला ‘व्यवसाय’ मानून जगता येईल अशी आजही परिस्थिती नाही. गेल्या दीडशे वर्षात ज्यांनी ज्यांनी मराठी साहित्यनिर्मिती केली त्या सर्वांनी आपला चरितार्थासाठीचा व्यवसाय वेगळा ठेवलाय आणि त्यांचं लेखन त्यांचा छंद म्हणून जोपासला आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः आधुनिक गद्य लेखनाला सुरूवात झाल्यानंतर ते आजअखेर केवळ साहित्यावर उपजिविका चालविणारे अत्यंत अल्प लेखक होऊन गेले.…
पुढे वाचा