येशू ख्रिस्त आणि त्याचे जीवन हा नेहमीच चर्चेचा आणि वादांचा विषय राहिला आहे. श्रद्धाळू ख्रिश्चनांचा बायबलवर अढळ विश्वास असल्याने अर्थात ते या वादांकडे आणि विद्वानांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्यास आणि आक्रमक होत असल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही परंतु संशोधनाच्या आणि चिकित्सेच्या जगात श्रद्धेला स्थान नसते. किंबहुना अनेक श्रद्धा अंधश्रद्धा बनण्याच्या मार्गावर असताना चिकित्सा या श्रद्धांचा भंग करत मानवी जगाला स्वच्छ आणि नितळ दृष्टी द्यायचे कार्य करत असते. ख्रिस्ती धर्माची मान्यता आहे की पॅलेस्टाइनमधील जेरूसलेमजवळील बेथलेहेम नावाच्या लहानशा गावात एका यहुदी (ज्यू) कुटुंबात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. वयाच्या 27-30…
पुढे वाचा