व्यवस्था परिवर्तनात प्रामुख्यानं प्रशासकीय, राजकीय लोकांचा वाटा मोठा असतो. यात हिरालालजी पगडाल यांच्यासारखे सामाजिक भान असणारे कार्यकर्ते, नेते महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आपल्या तर्कसुसंगत वागण्यानं, तत्त्वांशी तडजोड न करता ते जे काही घडवतात, निर्माण करतात ते म्हणूनच दखलपात्र ठरतं. आपल्या कार्यकर्तृत्वानं संपूर्ण समाज बदलावा अशी अपेक्षा कोणीही ठेवणार नाही; मात्र एखादी व्यक्ती बदलली, एखादं कुटुंब घडलं तरी ती मोठी गोष्ट असते. हिरालालजी यांनी समाजातील अनेक चुकीच्या प्रथा- परंपरा धाडसानं बंद पाडण्यात यश मिळवलं. टोकाची गरिबी वाट्याला येऊनही त्यांनी दगडावर झाड लावलं. ते रोपटं तो दगड फोडून मातीत रूजलं, वाढलं आणि पानाफुलांनी बहरलेल्या डौलदार वृक्षात त्याचं रूपांतर झालं. टोकाची प्रतिकूलता असतानाही हिरालालजी पगडाल यांनी त्यांच्यातील कार्यकर्ता, वक्ता, शिक्षक घडवला. कुणाचेही मिंधे नसल्यानं त्यांना भूमिका घेता आल्या. मनासारखं जगण्यासाठी जे नैतिक अधिष्ठान लागतं ते यातूनच प्राप्त होतं. त्यांचं जगणं संघर्षमय आहे. इवलीशी पणती ज्याप्रमाणे अंधाराचं साम्राज्य दूर करते त्याप्रमाणे हिरालालजींनी त्यांच्या आयुष्याची वाटचाल केली आहे. म्हणूनच हे आत्मचरित्र प्रेरणादायी आणि अनेकांना उभारी देणारं ठरेल,याची मला खातरी आहे.
– घनश्याम पाटील
- Subtotal
- ₹ 121.00
- Total
- ₹ 121.00