जे. डी. पराडकर यांना मी गेली अनेक वर्षे ओळखतो. अत्यंत साध्या, सरळ आणि सर्वांना कळेल अशा भाषाशैलीत जे. डी. जे लेखन करतात ते मला नेहमीच भावते. मी त्यांच्या लेखाची आवर्जुन वाट पाहत असतो. रविवारची माझी सकाळ जे. डी. यांच्या लेखनाने प्रसन्न होते. त्यांच्या लेखनाचा केवळ मीच चाहता आहे असे नव्हे तर माझ्या अभिनय क्षेत्रातील असंख्य सहकाऱ्यांना मी त्यांचे लेख पाठवत असतो आणि त्यांनाही हे लेखन आवडल्याचे अभिप्राय ते मला आवर्जून देत असतात.
जे. डी. पराडकर यांची एका शब्दावरुन लेख लिहिण्याची शैली पाहून त्यांच्या लेखणीची ताकद कळते. मला कोकण कमालीचे आवडते. जे. डी. आपल्या लेखणीतून मलाच काय, असंख्य वाचकांना कोकणचे प्रत्यक्ष दर्शन घडवत असतात. कोकणचे पर्यटन, पर्यावरण, ऐतिहासिक वास्तु, संस्कृती, चालीरीती, निसर्गातील विविध घटक यावर ते करत असलेले लेखन म्हणजे खरोखर एक दस्ताऐवज ठरतआहे.
विविध विषयांवर लेखन करणाऱ्या या चतुरस्त्र लेखकाचे ‘चपराक प्रकाशन’चे संपादक घनश्याम पाटील ‘प्राजक्ताचे सडे’ हे पुस्तक प्रकाशित करत आहेत. प्राजक्ताचे सडे हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे मला वाटते. हे एक सर्वांगसुंदर पुस्तक ठरणार आहे.
दिवसभर चित्रीकरण करत असताना येणारा आम्हा कलाकारांचा थकवा दूर करण्यास जे. डी. यांचे सकारात्मक लेखन नेहमीच मदत करते, हे सांगायला मला नक्कीच अभिमान वाटतो. माझे अत्यंत जवळचे मित्र असलेल्या जे. डी. पराडकर यांचे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ‘चपराक’ चे घनश्याम पाटील यांचे मी खास अभिनंदन करतो आणि जे. डी.ना पुढील नवनवीन लेखनासाठी शुभेच्छा देतो.
-सतीश सलागरे, अभिनेता
- Signup Fee
- ₹ 99.00
- Subtotal
- ₹ 99.00
- Total
- ₹ 99.00