एक जागरूक, डोळस आणि संवेदनाक्षम प्रज्ञेने नित्य व नैमित्तिक अवलोकन करूनच या स्थितीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रभावी प्रयत्न वेळोवेळी श्री. शंकर, गो. पांडे यांनी केलेला आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळात सहाय्यक लेखापाल म्हणून कार्यरत असताना वाणिज्य विद्याशाखेची स्नात्तकोत्तर पदवी घेऊन त्यात धन्यता न मानता आपल्या चोखंदळ अभिरुचीने स्नातकोत्तर मराठीची पदवी व इंग्रजी साहित्याची स्नातक पदवी आपल्या अध्ययनाने संपादन केली. या तपश्चर्येचे पर्यवसान अखंड वाचन, चिंतन आणि मनन या दृष्टिने होताना विचारधनांचे जे जे मंथन झाले त्यातून समकालीन नियतकालिकांतून, समकालीन विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यास त्यांनी प्रारंभ केला. घरंदाज संस्कारसंपन्न कुटुंबातील बालपणातील अमिट संस्कारांची अनुभवसमृद्ध शिदोरी घेऊन बोधकथांचे बालकांसाठी बारा संग्रह 'तेजस्विनी' या कथासंग्रहाबरोबरच हिंदुत्व, सामाजिक, कृषी, विज्ञान, पर्यावरण, अर्थकारण, नीत्तिमत्ता, अर्थसत्ता इ. विषयावर प्रगल्म चिंतन सादर करणारे चार-पाचशे लेख महाराष्ट्राच्या वाचकांसाठी विचारपीठावर प्रकाशित केले आहेत. दैनिके, साप्ताहिके, मासिके व वार्षिकांतून, लोकमानस, वाचकवेध, वाचकांचा पत्रव्यवहार यामधून सहाशेपेक्षा संसूचनातून आपला अभिप्राय वेळोवेळी प्रकट केला आहे. आपली व्यवसायिक नीती व कर्तव्यांची आचारसंहिता सांभाळून हे लेखन झालेले आहे. 'नक्षल व माओवादाचा भस्मासूर' या समस्याप्रधान असलेल्या ग्रंथास ग्रंथालय 'भारतीचा द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अखंड वाचन, पर्यटन, छायाचित्रण व समकालीन व्याख्यानमालांतून प्राप्त केलेली बहुश्रुतता यांनी हे व्यक्तिमत्व संपन्न झालेले आहे.
-प्रा. डॉ. बा. दा. जोशी
- Subtotal
- ₹ 121.00
- Total
- ₹ 121.00