असे म्हणतात की, एक चित्र हजारो शब्दांचे कार्य करते. याचप्रमाणे व्यक्तिचित्रणही त्या व्यक्तिमधील सर्व गुण, लकबी, सवयी हुबेहूब वर्णनाने दाखाविण्याचे सामर्थ्य शब्दात असते. मराठीतील व्यक्तिचित्रणाचा मागोवा घेतल्यास आपणास असे दिसते की, मराठीत व्यक्तिचित्रणाची परंपरा मोठी आहे. त्याची सुरुवात अगदी श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, ह. मो. मराठे येथून केली तर अगदी अलीकडील काळातील विनय हर्डीकर, रामदास भटकळ इथपर्यंत ही परंपरा सांगता येईल. हीच परंपरा पुढे येण्याचे कार्य जे. डी. पराडकर यांनी ‘असं जगावं कधीतरी’ या व्यक्तिचित्रणातून साकार केलेले आहे.
व्यक्तिंची वेशभूषा, केशभूषा, लकबी, सवयी आणि इतर सर्व गुणवैशिष्ट्ये यांचे वर्णन इतके समर्पकपणे केले आहे की जे. डी. यांनी ती व्यक्ती साक्षात समोर उभी केली आहे. जे. डी. पराडकर यांच्या ‘असं जगावं कधीतरी’मधून भेटणारी माणसं जगण्याचा मार्ग समृद्ध आणि प्रशस्त करणारी, सार्या जगाला सन्मार्ग दाखवणारी ही कोकणची रत्ने वाचकांना निश्चितच प्रेरणादायी ठरतील. जे. डी. यांची लेखनी अशीच बहरत राहो हीच शुभेच्छा.
– रविंद्र खंदारे
लेखक आणि उपशिक्षणाधिकारी, सातारा
- Signup Fee
- ₹ 99.00
- Subtotal
- ₹ 99.00
- Total
- ₹ 99.00