जे. डी. पराडकर यांचे ‘अक्षरयात्रा’ हे ‘चपराक’ तर्फे प्रकाशित होणारे पाचवे पुस्तक आहे. कोकण म्हणजे सुंदर निसर्ग, अंतर्मनाला साद घालणारी बोली भाषा, येथील चालीरीती-परंपरा हे सारंच अद्भूत आहे. पराडकर यांनी आपल्या ३२ वर्षाच्या लेखन प्रवासात कोकणची नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांच्या लेखणीतून कोकण केवळ वाचायला मिळते असे नव्हे तर ते डोळ्यासमोर उभे करण्याची ताकद पराडकर यांच्या लेखणीत आहे. छोटे-छोटे विषय हलक्या फुलक्या शब्दात वाचकांसमोर उलगडताना वाचकही या विषयात समरस होऊन जातो.
पराडकर यांनी २७ मार्च २०२० ते ५ जुलै २०२० या कालावधीत सलग शंभर दिवस १०० लेख लिहून वाचकांसाठी आपली लेखनसेवा रूजू केली. हे लेख वाचकांना नवचैतन्य देणारे ठरले. एका शब्दावरून विस्तृत लेख लिहिण्याची जे. डी. यांची खासियत आहे.
– एस. एम. देशमुख
मुख्य विश्वस्त, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद
- Subtotal
- ₹ 99.00
- Total
- ₹ 99.00