नगर-एक पर्यटन स्थळ

नगर-एक पर्यटन स्थळ

आम्हाला नगर शहरच नाही तर सबंध जिल्ह्याचा अभिमान आहे. अहमदनगर जिल्हा संतांची पावनभूमी म्हणून ओळखला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ई.स. 1272 मध्ये ज्ञानेश्वरी कथन करताना ज्या खांबाला ते टेकून बसत तो नेवासे येथील ‘पैस’ खांब भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. या पवित्र स्तंभावर चंद्र, सूर्य आणि शिलालेख कोरलेला आहे. नेवासे नगरहून केवळ 56 किलोमीटरवर आहे. देव आहे पण देऊळ नाही, घरे आहेत पण दारे नाहीत असं शनी देवाचं जागृत देवस्थान शनी-शिंगणापूर नगरपासून 38 किलोमीटरवर आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थक्षेत्र असणारे शिर्डी, साईबाबांचे समाधी मंदीर नगरपासून 81 किलोमीटरवर आहे. बाबांच्या वास्तव्याच्या खुणा ते…

पुढे वाचा