झुमरी

झुमरी

माझ्या लेकीची नवी कोरी सायकल घरी आली अन् तिच्या आनंदाला उधाण आले. मला म्हणाली, ‘‘आई, तुझ्या बाईकला तू ‘हरणी’ म्हणतेस ना! मग माझ्या सायकलला नाव सुचव!’’ मी गमतीनंच म्हटलं ‘‘झुमरी..!’ घरातील सगळेच हसायला लागले अन् माझी मनी मात्र रुसून बसली. तिला काही हे नाव आवडले नाही पण मला मात्र जाम आवडले. या झुमरीने माझ्या बालपणातील हरवलेले कित्येक क्षण परत दिले. वाटून गेलं, सायकलचा वेग आपण आपल्या इच्छेप्रमाने कमी-जास्त करू शकतो. कुठं जायचं, कुठं थांबायचं, कुठं गतिमान व्हायचं अन् कुठून परत फिरायचं… सारं सारं आपल्या हातात असतं! जीवनाचा वेगही आपल्या हातात…

पुढे वाचा