आयुष्यावर बोलतो काही!

जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे नको करूस क्रोध त्रागा, जो तुलाच तुझ्यापासून दुरावेल तू तुझाच आहेस, परंतु सर्वांना हवा आहेस दु:ख हे सर्वांनाच असते, नाही त्यातून तुझी सुटका दु:खातही सुख शोधावे, हेच जीवनाचे सार्थक आहे

पुढे वाचा

विठ्ठलाचे ‘देखणे’

वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात आयुष्याचं मार्गक्रमण असताना वाटेत दिसणारी प्रत्येक व्यक्ती ही तुकोबा-माऊलींच्या रूपात पाहणे आणि त्यांच्यातला अंतर्रुपी विठ्ठल शोधणे यात जे आध्यात्मिक, आत्मिक समाधान मिळते, त्याची तुलना जगात कुणासोबतही होऊ शकत नाही. या आनंदातून मिळणारी विठ्ठलाच्या सहवासाची एकरूपता ही जगण्याच्या वास्तवाचं भान मिळवून देते. शेवटी वारी म्हणजे काय तर तुम्हाला मिळालेला सर्वसामान्यांच्या आध्यात्मिकतेचा आत्मिक साक्षात्कारी आनंद… आणि त्यातून विठ्ठलाचं देखणेपण रामरूपी चंद्राच्या शीतलतेतून शोधून, आपल्याला त्याचा परिसस्पर्श घडवणारे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे…

पुढे वाचा

वाडे चिरेबंदी; रस्ते माणुसकीचे!

पाचशे वर्ष दिमाखाने उभी असणारी किल्ल्याची वास्तू जशी नगरची शान आहे, तशाच अनेक ऐतिहासिक वास्तू देखील शहरात आहेत. नगर शहरात नऊ वेशी होत्या! पैकी माळीवाडा आणि दिल्ली दरवाजा वेस आजही अस्तित्त्व टिकवून आहेत. त्या पाडण्याची मोहीम निघाली होती पण इतिहास संशोधकांनी कोर्टात जाऊन त्या वाचवल्या. त्यावेळी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांची मदत झाल्याचा इतिहास आहे. बागरोजा, दमडी मशीद, चांदबीबी महाल अशा अनेक वास्तू नगरची शान आहेत; तरीही आम्हाला आठवतात ते आमचे दगडी वाडे! आमच्या शाळेच्या इमारती!

पुढे वाचा

महिलांच्या विकासाचा निर्धार हाच खरा पुरुषार्थ

सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले तर आजची स्त्री ही दिवसेंदिवस नुसती शिकत नाही तरी ती सुशिक्षित होऊन आपल्या समाजाला निश्चितपणे प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते आहे हे चित्र आज सर्वदूर पहायला मिळते आहे.  ह्याची पाळेमुळे एकोणविसाव्या शतकातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांनी समाजात रुजवून आपल्या समाजावर फार मोठे उपकारच केले आहेत असे नमूद करणे गरजेचे वाटते. ज्या काळी स्त्री ही फक्त चूल आणि मूल ह्यासाठीच जन्माला आली आहे असा प्रघात असताना त्यांनी केलेले हे धाडस आज एकविसाव्या शतकात महिलांच्या विकासाकडे पाहिले की जाणवते की त्यांचा स्त्रीशक्तीचा हा विचार किती दूरदृष्टीचा होता आणि आपल्या देशासाठी…

पुढे वाचा