अपूर्व मेघदूत : हृदयद्विजेत्या प्रतिभेचा रंगमंचीय आविष्कार!

आषाढाच्या पहिल्याच दिवशी कवीकुलगुरू कालिदासांचे मेघदूत रंगमंचावर जिवंत अवतरलेले पहायला मिळणे हे भाग्यच आहे. मेघदूत हा निवांत वाचत अनुभवण्याचा विषय अशी सर्वसाधारण समजूत असल्यास नवल नाही. कालिदासाची प्रतिभाच एवढी की काव्याविष्कारात जेव्हा तो बोलतो तेव्हा तो हृद्य प्रतिमांच्या विलक्षण जगात घेऊन जात असतो. मेघदूतात त्याने विरही यक्षाचा पत्नीला संदेश देण्यासाठी निवड केलीय तीही एका मेघाची. कालिदासाशिवाय मेघ-दूताची निवड तरी कोण करणार? हे अजरामर काव्य मंचित करण्याचा विचार करणे हाच एक वेडाचार असे कोणीही म्हणेल. ज्यांना मेघदूत माहीत आहे ते तर नक्कीच. पण तसे झाले आहे. पण हे येथेच संपत नाही.…

पुढे वाचा