दादा वाक्यं प्रमाणम्

दादा वाक्यं प्रमाणम्

यशवंतराव चव्हाण यांनी एकदा सांगितलं होतं की, ‘‘आमच्या पुढार्‍यांना ‘नाही’ म्हणायची सवय नाही आणि आमच्या अधिकार्‍यांना ‘हो’ म्हणता येत नाही. सामान्य माणसाला त्याचं काम होईल असं सांगणारे अधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्याचे जे काम करणे शक्य होणार नाही त्यांना स्पष्टपणे नाही म्हणणारे नेते मला हवेेत.’’

पुढे वाचा

लाख बोलक्याहूनि थोर…

लाख बोलक्याहूनि थोर...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की, ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार!’ असं असूनही आपल्याकडं बोलत सुटणार्‍यांची कमतरता नाही. असं म्हणतात की, बाळाच्या जन्मानंतर त्याला बोलायला शिकायला काही दिवस जातात मात्र ‘काय बोलावं’ हे कळण्यासाठी सगळं आयुष्य निघून जातं. सध्या तरी समाजमाध्यमांमुळं प्रत्येक गोष्टीत माझी मतं मांडायलाच हवीत, कुणाला तरी समर्थन द्यायलाच हवं आणि कुणाला तरी विरोध करायलाच हवा अशी एक अहमहमिका लागलेली असते. यातून साध्य काय होणार याचाही कोणी विचार करत नाही.

पुढे वाचा

वाचाळवीरांची कुचकामी फौज

वाचाळवीरांची कुचकामी फौज

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँग्रेस अशा आघाडीचं सरकार आहे. या तीन पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्याने त्यांना महाआघाडी सरकार म्हणतात. या महाआघाडीत काँग्रेस पक्ष नेमका कुठंय हे समजून येत नाही. काँग्रेसचे मंत्री नेमक्या कोणत्या खात्याचे आहेत आणि काय काम करताहेत, त्यांची कामगिरी काय? हेही समजून येत नाही. राष्ट्रवादीचा गृहमंत्री, त्यांचाच अर्थमंत्री सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या खात्यावर बोलताना दिसतो. शिवसेनेचा परिवहन मंत्री एसटी बस बंद असतानाही त्याचं खातं कसं सुरू आहे हे दाखवून देतो. त्यामानानं मुळात काँग्रेसचे राज्यात कुठले मंत्री आहेत हेही ठळकपणे जाणवत नाही.

पुढे वाचा

वाचाळवीर हरी नरके

वाचाळवीर हरी नरके

‘हा कसला महात्मा? ही तर फुले नावाची दुर्गंधी’ अशा आशयाची अत्यंत संतापजनक आणि चुकीची मांडणी बाळ गांगलसारख्या कोणी केल्यावर किंवा ‘हले डुले महात्मा फुले’ अशी म्हण कुणी अग्रलेखातून मांडल्यावर त्याचा तीव्र विरोध व्हायलाच हवा. महात्मा फुले हे कोणत्याही एका जातीधर्माचे नाहीत तर ते सर्वांचेच आहेत.

पुढे वाचा

आर्ट ऑफ ‘पॉलिट्रिक्स!’

आर्ट ऑफ ‘पॉलिट्रिक्स!’

‘‘अणीबाणी लोकांसाठी त्रासदायक असली तरी माझ्यासाठी ती चांगली होती. कारण ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, मोहन धारिया त्याकाळी आमच्या बडोद्याच्या घरात रहायला होते. मी पक्का संघवादी. अणीबाणीच्या काळात आमच्या घरातील या समाजवाद्यांचं वास्तव्य तिथं काम करणारा पोर्‍या बघत होता. तो या सगळ्यांना चहा देत होता, त्यांची सेवा करत होता.

पुढे वाचा

मलमपट्टी नको; माणूस उभा करा!

मलमपट्टी नको; माणूस उभा करा!

कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळं भयप्रद परिस्थिती निर्माण झालेली असतानाच विविध प्रांतात निसर्गाचं तांडवही अनुभवायला येत आहे. मागच्या वर्षी कोकण भागात निसर्ग चक्रीवादळानं हाहाकार उडवला. यंदाही तौैक्ते वादळानं होत्याचं नव्हतं झालं आहे. गेल्या वर्षी निसर्गाच्या तडाख्यानं कोकणवासीयांचं अतोनात नुकसान झालं. नारळ, पोफळी, फणस, कोकम, जायफळाच्या बागा क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या. शेकडो वर्षांची झाडं उन्मळून पडली. डोळ्यादेखत सगळं भुईसपाट होऊनही कोकणी माणसानं धीर सोडला नाही. न खचता, न डगमगता तो पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत होता.

पुढे वाचा

झुंडशाहीचं करायचं काय…?

झुंडशाहीचं करायचं काय...?

सार्वजनिक उपद्रव आणि झुंडशाही म्हणजे सार्वजनिकपणे जनक्षोभ किंवा जनआंदोलनाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन शिक्षेचा अधिकार स्वतःच्या हातात घेणे, एखादी गोष्ट करण्यापासून वाटेल त्यास बेकायदा प्रतिबंधीत करणे अथवा करवून घेण्यासाठी उपद्रव्यमूल्य वापरून अथवा तसे करण्याची धमकी देऊन केलेली दडपशाही अथवा दंडेलशाही होय.

पुढे वाचा

ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे

लेखक, पत्रकारांवर हल्ले करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे!

लेखक, पत्रकारांवर हल्ले करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे! एखाद्या व्यक्तिला एखाद्याच्या मतांबद्दल आपत्ती किंवा मतमतांतरे असतील तर त्याने त्याच माध्यमातून आपली मते व्यक्त करावीत. कारण दोन विद्वान जेव्हा वाद घालतात तेव्हा त्यातून येणारे परिणाम हे कायमच सुखद असतात.

पुढे वाचा

भ्रमिष्टपणा की एजंटगिरी?

भ्रमिष्टपणा की एजंटगिरी?

‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते असं सांगितलं जातं. आजवर त्यांनी जी विधानं केली ती पाहता या माणसाच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या जगण्याचा काही संबंध आहे की नाही? असा प्रश्न कुणालाही पडल्यावाचून राहणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, अमूक बागेतला आंबा खाल्ला तर मुलगाच होतो, जो जितका जास्त शिकलेला तो तितका मोठा गांडू, कोरोना हा जगायला लायक नसलेल्या लोकांनाच होतो, असा कोणताही आजार नसून जो या रोगानं मरतो तो गांडू अशी अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी सातत्यानं केली. हे सगळं पाहता वाटतं…

पुढे वाचा

पिऊन वीज मी फुले फुलविली

पिऊन वीज मी फुले फुलविली

चपराक दिवाळी विशेषांक 2020 – मृण्मयी पाटणकर, सिडनी, ऑस्ट्रेलिया व. पु. काळे यांच्या ‘वलय’ या पुस्तकामधली एक कथा आहे – ‘पिऊन वीज मी फुले फुलविली’. या गोष्टीतली मंजू लेखकाला एका प्रवासात भेटते. अत्यंत सुंदर… सौंदर्याची थोडीशी भीतीच वाटावी अशी. इच्छा असूनही आपण काही बोललो तर कदाचित ही आपला अपमान करेल या भीतीनं लेखक बोलायचं टाळतो पण मंजूच संवादाला सुरुवात करते आणि बघता बघता लेखकाचं मत साफ बदलून जातं. सौंदर्याचा जरासाही गर्व मंजूला नसतो. अत्यंत निर्मळ आणि दुसर्‍याला आपलंसं करून टाकणारं तिचं व्यक्तिमत्त्व लेखकाला भारावून टाकतं.

पुढे वाचा