माझा जन्मच मालवणचा! माझे वडील स्व. जयंतराव साळगांवकर हे लहानाचे मोठे मालवणमध्येच झाले. पुढे ते नोकरीकरिता मुंबईला आले आणि येथेच स्थायिकही झाले. तरी दरवर्षी गणेश चतुर्थीला आम्ही सर्व कुटुंबीय मालवणला जाऊन घरी गणेशाची मूर्ती आणून, तिची यथासांग पूजा करून आणि पाचव्या दिवशी विसर्जन करूनच मुंबईला परतत असू. अनेक वर्षे हे सुरू होते. मुंबईला जेव्हा त्यांनी एक इमारत विकत घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्या आई म्हणजे आमच्या आजी स्व. इंदिराबाई साळगांवकर यांच्याशी विचारविनिमय करून गणपती मुंबईत आणावयास सुरुवात केली. तीच प्रथा अजूनही आमच्या कुटुंबात सुरू असून आमच्या समस्त साळगांवकर कुटुंबाचा तो एकच…
पुढे वाचा