माझिया शिवारा घडो परिक्रमा

माझिया शिवारा घडो परिक्रमा

आपल्या जवळ काय काय आहे याचा माणसाला पुष्कळदा विसर पडतो. कधी कधी अतिपरिचयात अवज्ञा झाल्यासारखेही होते. गावातील एक-दोन मित्र ‘वर्ष-सहा महिन्यातून आपण मित्र मिळून कोठेतरी फिरायला जाऊ’ असे अनेकदा म्हणत असतात. त्यांच्या त्या विचारांमुळे साहजिकच अंगात उत्साह संचारतो. ‘मग आपण फिरायला कोठे जाणार?’ असे विचारताच त्याचे उत्तर तयार असणार ‘गोवा’. त्याला गोवा म्हणजे त्यातील फक्त पणजी, तेथील सागर किनारा बघायला खूप आवडतं. तिथला समुद्र किनारा, निसर्ग मनाला भावतो, भूरळ घालतो. बाकीबाब बोरकरांच्या ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ ही कविता आपोआप ओठावर नाचू लागते. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा करून विषय संपवतो. मी…

पुढे वाचा