वेदांपासून ते अगदी आजच्या काळापर्यंत पूजला जाणारा देव म्हणजे गणपती होय. ऋग्वेदातील एक ऋचा आहे त्याला गणपती सुक्त असे म्हणतात. पुराण काळात तर गणपतीच्या अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. आज गणपती केवळ देवळात पुजला जातो असे नाही तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपात बसवलेल्या मूर्तीलाही मंदिरातल्या गणपतीइतकेच महत्त्व दिले जाते. भाद्रपद महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाला जितके महत्त्व आहे तसेच महत्त्व आता माघ महिन्यात गणेश जन्माच्या निमित्ताने होणाऱ्या उत्सवालाही येऊ लागले आहे. गणरायाचा हा उत्सव आता दिवाळीपेक्षा देखील मोठा होईल का काय? असे रूप या उत्सवास प्राप्त झाले आहे. केवळ भारतातच नव्हे तर…
पुढे वाचा