मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनेची नोंद

कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण नजिकच्या धामणवणे येथील श्रीविठ्ठलाई आणि श्रीविंध्यवासिनी मंदिरांचे सान्निध्य लाभलेल्या डोंगरात 2021 च्या वर्षारंभी सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची आणि त्यांची आई बिबट्याची भेट घडवून आणण्यासाठीच्या शासकीय वनविभाग रत्नागिरी आणि वन्यजीव अभ्यासकांच्या प्रयत्नांना आठवड्याभराच्या संयमित प्रयत्नांनंतर यश प्राप्त झालं. मातृत्वापासून कायमचे पारखे होण्याच्या वाटेवर असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना (एक नर, एक मादी) मादी बिबट्याने सोबत घेऊन सुरक्षित नैसर्गिक अधिवास गाठला. या संपूर्ण ‘आँखो देख्या’ घटनाक्रमात वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासकांना मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनायुक्त वर्तणुकीची दुर्मीळ नोंद करता आली. या संवेदनशील विषयाबाबत कमालीची गुप्तता पाळली गेल्याने बघ्यांची अपेक्षित…

पुढे वाचा