प्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल

सहा फुटापेक्षा जास्त उंच, गव्हाळ रंग, शुभ्र केस, भारदस्त खाकी पोशाख, रूबाबदार चाल, चेहर्‍यावर करारी भाव असणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरिश बैजल त्यांच्या गाडीतून उतरून चालत समोर आले तेव्हा दडपून जायला झालं. वेळ कमी आहे आणि मुलांशी बरंच बोलायचं आहे…असं म्हणत ते थेट सभागृहात पोहोचले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात बैजल सरांविषयीचं कुतूहल आणि ऐकण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती. सरांविषयी बरंच ऐकलं, वाचलं होतं. मुलाखत घ्यायची म्हणून अजून खोदून माहिती काढली होती. मुलाखतीच्या सुरूवातीच्या प्रश्नात तुम्ही खाकी पोशाखाकडे कसे वळलात? अर्थात पोलीस अधिकारी व्हावं हे कधी वाटलं? या प्रश्नाचं उत्तर देताना लहानपणी डॉ.…

पुढे वाचा