कौसल

फाटकावर थांबूनच त्याने हवेली डोळाभर न्याहाळली. मोठ्या झाडाची पानगळ झाली तरी त्याचा भक्कमपणा गळत नसतो असंच काहीसं वाटलं त्याला. हवेलीचं जुनं वैभव जरी खंगलं होतं तरी तिची ऐट काही कमी झाली नव्हती. श्रीमंती उपभोगलेल्या किंचित प्रौढ बाईसारखी वाटत होती ती. ‘‘कलेक्टर साहेबानं पाठवलं का तुम्हाला?’’ कुणीतरी त्याला बोललं म्हणून तो भानावर आला. त्यानं त्यांच्याकडं बघितलं. एक म्हातारा माणूस, अरे हे तर दामूअण्णा! ‘‘हो.’’ ‘‘या साहेब, या’’ असं म्हणत दामुने त्याची बॅग घेतली अन् वाड्याकडे चालू लागला. तोही त्याच्या पाठोपाठ चालू लागला. ‘‘किती दिवस थांबावे लागेल?’’ ‘‘दोन-चार दिवसात होतील सगळे व्यवहार.’’

पुढे वाचा